‘रमाई’ अंमलबजावणीत महापालिका माघारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:44 PM2017-09-07T21:44:35+5:302017-09-07T21:45:00+5:30
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती महापालिका माघारल्याचा आक्षेप आ. रवि राणा यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती महापालिका माघारल्याचा आक्षेप आ. रवि राणा यांनी घेतला. ‘रमाई’तून गरीब, सामान्यांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी २६ एप्रिल २०१७ रोजी ३७.५० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त असताना ते केव्हा वाटप करणार, असा सवाल त्यांनी बुधवारी आढावा बैठकीतून उपस्थित केला.
येथील शासकीय विश्रामभवनात रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आ.राणांच्या पुढाकाराने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार, शहर अभियंता जीवन सदार, उपायुक्त देशमुख, नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, उपकार्यकारी अभियंता रवींद्र पवार, विधी व न्याय सभपाती सुमती ढोके, नगरसेवक आशिष गावंडे, सपना ठाकूर, उमेश ढोणे, विनोद जायलवाल आदी उपस्थित होते. यावेळी आ. राणा यांनी आवास योजनेत दिरंगाई होत असल्याची बाब आवर्जून मांडली. घरकूल मंजूर झाले असताना प्रशासनाच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांना धनादेश मिळत नसल्याची बाब उपस्थित केली. ५४९ घरकूल मंजूर झाले असताना लाभार्थ्यांना धनादेश कधी, कसे? वितरित करणार, असा जाब आयुक्त हेमंत पवार यांना आ. राणांनी विचारला. रमाई घरकूल आवास योजनेचे अनुदान प्राप्त असताना ते वाटपात दिरंगाई होत आहे.