ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:12+5:302021-01-25T04:14:12+5:30
गावात पसरली दुर्गंधी : प्रतीक्षा नव्या ग्रामपंचायतची ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत गणना होणाऱ्या ब्राह्मणवाडा थडी ...
गावात पसरली दुर्गंधी : प्रतीक्षा नव्या ग्रामपंचायतची
ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत गणना होणाऱ्या ब्राह्मणवाडा थडी येथे अस्वच्छतेने थैमान घातले आहे. एक वर्षापासून ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक व ग्रामसेवकाकडे गावाची जबाबदारी आहे. मात्र, उभय अधिकारी गावाकडे फिरकत नसल्याने गावगाडा ठप्प झाला आहे. निवडणूक होऊन नवे सदस्य निवडून आलेत, मात्र सरपंचपदाची आरक्षण सोडत निघाली नसल्याने ग्रामपंचायत स्थापित झालेली नाही. परिणामी, गावाचा कारभार ‘रामभरोसे’ झाला आहे.
गावातील नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात न आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. गटारे तुडुंब भरली आहेत. गावातील मुख्य रस्ता असलेल्या ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या मार्गावरील रपटासुद्धा फुटला. त्या ठिकाणी नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. दुचाकींनादेखील किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मात्र, ग्रामसेवक गावाकडे फिरकत नसल्याने तक्रार करायची तरी कुणाकडे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
---------------