कुपोषित बालकांसोबत रमल्या सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:13 PM2018-09-15T22:13:33+5:302018-09-15T22:14:09+5:30

प्रत्येक महिलेची प्रसूती ही रुग्णालयात झालीच पाहिजे, यासाठी अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्यासोबतच कुपोषित बालकांना नियमित आहार देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री यांनी सेमाडोह येथे गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत दिले.

Ramlya CEO with malnourished children | कुपोषित बालकांसोबत रमल्या सीईओ

कुपोषित बालकांसोबत रमल्या सीईओ

Next
ठळक मुद्देयोजनांचा आढावा : सुदृढ बालकांच्या मातांचा सत्कार, अमृत आहार योजनेची तपासणी

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : प्रत्येक महिलेची प्रसूती ही रुग्णालयात झालीच पाहिजे, यासाठी अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्यासोबतच कुपोषित बालकांना नियमित आहार देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री यांनी सेमाडोह येथे गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत दिले. त्यानंतर त्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन गर्भवती स्तनदा माता व कुपोषित बालकांचे बसून आहाराची तपासणी करीत आदिवासी महिलांशी हितगूज केले.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. सेमाडोह येथे दोन्ही तालुक्यांच्या अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा वर्कर आदींची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री यांनी घेतली. बैठकीला महिला, बालकल्याण, उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रशांत थोरात, मानकर, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, सीडीपीओ विलास दुर्गे, झंजाड, तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान, विस्तार अधिकारी योगेश वानखडे, पर्यवेक्षिका सालेहा खान, आशा निंबाळकर, बीडीओ काळे आदी कर्मचारी-अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीईओ मनीषा खत्री यांनी दोन्ही तालुक्यांतील कुपोषणाचा आढावा यावेळी घेतला. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. १ ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या पोषण आहार अभियानानिमित्त त्यांनी कुपोषित बालक गर्भवती व स्तनदा मातांना दिल्या जाणारा अमृत आहार योजनेची तपासणी केली. सेमाडोह येथील अंगणवाडी केंद्रात तब्बल एक तास कुपोषित बालके, गर्भवती व स्तनदा मातांसाठी दिला जाणारा आहार सीईओ मनीषा खत्री यांनी स्वत: खाली बसून खाऊन पाहिला. आदिवासी महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्हा समन्वयक तथा अवतार फाउंडेशनचे प्रतिनिधी शाश्वत कुलकर्णी यांनी आदिवासी महिलांना यावेळी मार्गदर्शन केले.
केंद्रनिहाय आढावा
सीईओ मनीषा खत्री यांनी धारणी व चिखलदरा तालुक्यातील कुपोषित बालकांचे वजन घेण्यासोबतच किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी संदर्भ देऊन मातांवर विशेष काळजी घेणे आदीबाबत केंद्रनिहाय आढावा घेतला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शनही केले.
सुदृढ बालकाच्या मातेचा सत्कार
कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात बालमृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याची खंत आहे. अशातच चिखलदरा तालुक्याच्या आमझरी येथील सहा महिने वयाच्या अर्जुन अरुण बेलसरे या बालकाचे वजन तब्बल साडेनऊ किलो असल्याने या बैठकीत पूजा अरुण बेलसरे या मातेचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Ramlya CEO with malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.