राणा दाम्पत्याची कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह न्यायालयात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:34+5:302021-09-15T04:17:34+5:30

येथील ८ वे सह दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात राणा दाम्पत्य शेकडो कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह हजर झाले. विविध ९ प्रकरणी एकत्रित ...

Rana couple's activists, farmers appear in court | राणा दाम्पत्याची कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह न्यायालयात हजेरी

राणा दाम्पत्याची कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह न्यायालयात हजेरी

Next

येथील ८ वे सह दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात राणा दाम्पत्य शेकडो कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह

हजर झाले. विविध ९ प्रकरणी एकत्रित सुनावणी झाली.

महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, एमएसईबी, जिल्हा कृषी कार्यालय आदी ठिकाणी राणा दाम्पत्याने शेतकरी-शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह जवळपास २०० कार्यकर्त्यांची मंगळवारी विविध ९ प्रकरणी सकाळी ११ ते दुपारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत न्यायाधीश एस. पी. तायडे यांचे न्यायालयात हजेरी लावली.

यावेळी सुनील राणा यांच्यासह जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, शैलेंद्र कस्तुरे, दिनेश टेकाम सुमती ढोके, आशिष गावंडे, मयूरी कावरे, जया तेलखडे, अजय घुले, रश्मी घुले, कल्पना बनकर, रोशनी लुचाईवाले, कल्पना मेश्राम, सचिन भेंडे, अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे, सद्दाम हुसेन, अभिजित देशमुख, सुखदेव तरडेजा, नितीन तायडे, पराग चिमोटे, रवी अडोकार, गणेश मारोडकर, अनुप खडसे, अवी काळे, नितीन म्हस्के, हर्षल रेवणे, विक्रांत कुयरे, शंकर डोंगरे आदी न्यायालयात हजर हाेते. सहा तास न्यायालयीन प्रक्रिया चालली. सर्व आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून न्यायमूर्ती तायडे यांनी सर्वांना जामीन मंजूर केला. युवा स्वाभिमान आंदोलकांच्या वतीने ॲड. दीप मिश्रा, ॲड. चंदू गुळसुंदरे, ॲड. महेश करुले, ॲड. सुषमा रायबोले, ॲड. नरेश सोनी आदींनी युक्तिवाद केला.

Web Title: Rana couple's activists, farmers appear in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.