राणा दाम्पत्याचे शक्तिप्रदर्शन; सेनेचे पोस्टर वॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 05:00 AM2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:55+5:30

शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. राजकमल चौकात जंगी स्वागत झाले. दसरा मैदानालगत संकटमोचन हनुमान मंदिरात त्यांनी चालिसा पठण केले. 

Rana couple's show of strength; Army Poster War | राणा दाम्पत्याचे शक्तिप्रदर्शन; सेनेचे पोस्टर वॉर

राणा दाम्पत्याचे शक्तिप्रदर्शन; सेनेचे पोस्टर वॉर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबई येथे ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करताच राजद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवस कारागृह कोठडीला सामोरे गेलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा हे तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी अंबानगरीत दाखल झाले. डीजे, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे, गाड्यांचा ताफा अशा शक्तिप्रदर्शनाने  त्यांनी वेगळीच छाप उमटविली. नागपूर ते अमरावती प्रवासातही समर्थक व हनुमानभक्तांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  
शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. राजकमल चौकात जंगी स्वागत झाले. दसरा मैदानालगत संकटमोचन हनुमान मंदिरात त्यांनी चालिसा पठण केले. 
दरम्यान, इर्विन चौकात भीम ब्रिगेडने विरोध केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तो मोडून काढला. 

रहाटगावात क्रेनद्वारे १५ फूट लांबीचा हार

रहाटगाव येथे राणा दाम्पत्यांचे आगमन होताच बाळू इंगोले यांनी १५ फूट लांब गुलाब पुष्पाचा हार चक्क क्रेनद्वारे आमदार रवि राणा, खासदार नवनीत राणा यांच्या गळ्यात घातला. यावेळी जय श्रीराम, पवनसुत हनुमान की जय अशा नाऱ्यांनी आसमंत दणाणून गेला. 

राजकमल चौकात ३५० किलोच्या हाराने स्वागत

राजकमल चौकात राणा दाम्पत्यांचे समर्थकांनी क्रेनद्वारे ३५० किलो वजनाच्या हाराने अभूतपूर्व स्वागत केले. राणा दाम्पत्य हात उंचावून नागरिक, व्यापारी, दुकानदारांना, वाहनचालकांना अभिवादन करीत होते.

Web Title: Rana couple's show of strength; Army Poster War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.