चांदूर रेल्वे तालुक्यात २९ गावांत रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:22+5:302020-12-22T04:13:22+5:30

प्रभाकर भगोले चांदूर रेल्वे : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २३ ते ...

Ranadhumali in 29 villages in Chandur railway taluka | चांदूर रेल्वे तालुक्यात २९ गावांत रणधुमाळी

चांदूर रेल्वे तालुक्यात २९ गावांत रणधुमाळी

Next

प्रभाकर भगोले

चांदूर रेल्वे : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ९३ प्रभागांतून २३५ सदस्य निवडण्यासाठी ४५ हजार ५१९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात २३ हजार ११२ महिला व २२ हजार ४०७ पुरुष मतदार आहेत. या निवडणुकीत ९७ मतदान केंद्रे राहणार असल्याची माहिती निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.

तालुक्यातील आमला विश्वेश्वर, सातेफळ, धनोडी, शिरजगाव कोरडे, सुपलवाडा, सावंगी मग्रापूर, लालखेड, पळसखेड, मालखेड, चिरोडी, बासलापूर, सावंगा विठोबा, धानोरा म्हाली, सोनोरा बुजरूक, घुईखेड, जावरा, राजुरा, वाई, किरजवळा, निमगव्हाण, धानोरा मोगल, मांजरखेड दानापूर, जवळा, बोरी, बग्गी, टिटवा, जळका जगताप, येरड या गावांतील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर निघणार असून, १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये झाली असल्यास निवडणूक लढविण्यास ते अपात्र ठरणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना आहे.

२०१५ च्या निवडणुकीतील ६५ उमेदवार यंदा अपात्र

सन २०१५ च्या निवडणुकीमध्ये उमेदवाराने विहीत रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील ६५ उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात आल्याने त्यांना २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत निवडणूक लढविता येणार नाही.

Web Title: Ranadhumali in 29 villages in Chandur railway taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.