रणजित पाटील यांची शिवटेकडीला भेट
By admin | Published: January 25, 2016 12:26 AM2016-01-25T00:26:20+5:302016-01-25T00:26:20+5:30
शहराचे वैभव असलेल्या शिवटेकडीला शुक्रवारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
अमरावती : शहराचे वैभव असलेल्या शिवटेकडीला शुक्रवारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील धार्मिक स्थळ नागरिकांची गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने शिवटेकडीवर पोलीस चौकी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवटेकडी परिसरात तयार करण्यात आलेले ग्रीन जीम, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केलेले सौंदर्यीकरण तसेच विविध वृक्ष लागवडीची माहिती जाणून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या व येथील धार्मिक स्थळावर दर्शनासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकर या ठिकाणी पोलीस चौकी निर्माण करण्याची सूचना दिली. या ठिकाणी नाना नानी पार्क, खुले रंगमंच, ग्रीन जीम, आधुनिक व्यायामशाळा, रेनगन, पब्लिक पॉवर प्रोजेक्ट, वॉल कंपाऊंड, पाणपोई, एक किमीचा ट्रॅक बनविण्यात आला आहे.
महापालिकेतर्फे या परिसराचे सौंदर्यीकरण व विकासकामांचे लोकार्पण व शिवटेकडी महोत्सवाचे आयोजन सोमवार २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमिवर ना. रणजित पाटील व अन्य अधिकाऱ्यांना अवलोकन केले आहे. यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पक्षनेता बबलू शेखावत, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, नगरसेवक दिनेश बूब, प्रदीप हिवसे, महापालिकेचे उपायुक्त चंदन पाटील, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)