रणवीर सिंग राहल भारतीय कुस्ती संघाचे नवे कोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:43+5:302021-07-24T04:10:43+5:30
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा कुस्तीगीर व पोलीस दलात कार्यरत रणवीर सिंग राहल यांची भारतीय ज्युनिअर कुस्ती ...
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा कुस्तीगीर व पोलीस दलात कार्यरत रणवीर सिंग राहल यांची भारतीय ज्युनिअर कुस्ती फ्री स्टाइल संघाचे कोच म्हणून नियुक्ती झालेली आहे. भारतीय ज्युनिअर कुस्ती संघ ऑगस्ट २०२१ मध्ये रशिया येथे ज्यु जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी जाणार आहे. त्यापूर्वी सोनीपत हरियाणाला भारतीय खेल प्राधिकरणचे ट्रैनिंग सेंटर आहे. तेथे २२ जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत रणवीर सिंग राहल २१ ज्यु भारतीय पहिलवानांना फ्री स्टाइल कुस्तीचे प्रशिक्षण देणार आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन मल्लसुध्दा ज्यु भारतीय कुस्ती संघात सहभागी आहेत. यापूर्वी रणवीर सिंगने भारतीय कुस्ती संघाला ६ वेळा प्रशिक्षण दिले आहे. ४ वेळा भारतीय कुस्ती संघाचे मार्गदर्शक म्हणून विदेशातसुध्दा गेले आहे, अशी महिती श्री. ह.व्या.प्र. मंडळाच्या कुस्ती विभागप्रमुख संजय तिरथकर यांनी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे विदर्भात कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह, बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, खासदार रामदास तडसअध्यक्ष विदर्भ कुस्ती संघटना, माधुरी चेंडके, प्रशांत देशपांडे, पोलीस आयुक्त आरती सिंह व कांदिवली साई सेंटरच्या ज्युसी यांनी रणवीर सिंगचे कौतुक केले. रणवीर सिंग याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजविल्या आहेत. ५ वेळा विदर्भ केसरी एम.पी.एड तसेच कुस्तीत संशोधन करून पीएच.डी डॉ.टॉमी जोस यांच्या मार्गदर्शनात केली. सध्या मुंबई येथे कांदिवली खेलो इंडिया सेंटरला ते कार्यरत आहेत. त्याच्या यशाबद्दल पोलीस दलात व श्री ह. व्या. प्र. मंडळात चैतन्य निर्माण झाले.