‘हॉटस्पॉट‘कॅम्पमध्ये आता रॅपिड अँन्टिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:18+5:302021-03-14T04:13:18+5:30
अमरावती : महापालिका क्षेत्रात पाचही झोनमधील ‘हॉटस्पॉट’मध्ये आता शनिवारपासून कोरोना अँन्टिजेन चाचण्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसे आदेश ...
अमरावती : महापालिका क्षेत्रात पाचही झोनमधील ‘हॉटस्पॉट’मध्ये आता शनिवारपासून कोरोना अँन्टिजेन चाचण्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
प्रत्येक झोनमधील चार ते पाच नगर हे कोरोना संसर्गाचे ‘हाॅटस्पॉट’झालेले आहे व या पॉकेटमध्ये जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होऊन संक्रमित निष्पन्न व्हावेत व त्यांच्यावर उपचार होऊन कोरोनाची साखळी खंडित व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. या अनुषंगाने या संबंधित भागातील सुपर स्प्रेडर असणारे व्यावसायिक, आस्थाना कार्यालये, वाहतूकदार, हॉकर्स व परिसरातील नागरिक यांना याठिकाणी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
या आदेशानुसार अर्जुननगर, रविनगर, रुख्मिणीनगर, जुना कॉटन मार्केट, भाजीबाजार, राधानगर, शंकरनगर, कॅम्प कलोतीनगर, राठीनगर, नवीवस्ती बडनेरा, खापर्डे बगीचा, वडाळी, कठोरा नाका, राजापेठ, जुनीवस्ती बडनेरा, अंबिकानगर व दस्तूरनगर, गाडगेनगर, गोपालनगर, साईनगर व काँग्रेसनगरमध्ये ही मोहीम राबविली जात आहे.
कोट
००००००
०००००००००००००
प्रशांत रोडे
महापालिका आयुक्त.