दुर्लभ ग्रंथ, भांड्यांवर परदेशी लेखकांचे संशोधन

By admin | Published: January 18, 2015 10:27 PM2015-01-18T22:27:06+5:302015-01-18T22:27:06+5:30

श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर

Rarer texts, foreign writers' research on fractions | दुर्लभ ग्रंथ, भांड्यांवर परदेशी लेखकांचे संशोधन

दुर्लभ ग्रंथ, भांड्यांवर परदेशी लेखकांचे संशोधन

Next

सुरेश सवळे - चांदूरबाजार
श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर असल्याचा उल्लेख असला तरी सध्या येथे १५० मंदिरे अस्तित्वात दिसतात तर नजीकच्या दाभेरी येथे ५० मंदिर अस्तित्वात आहेत. येथील गोपीराज ग्रंथ संग्रहालयात ४०० वर्षापूर्वीचे ग्रंथ व भांडी असली तरी याचे जतन करण्याचे प्रयत्न स्वत: येथील महंतांनीच केले आहे. त्यासाठी येथील महंतांनी कोणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही. या ग्रंथाची दखल अमेरिका व रशियाच्या लेखकांनी घेतली व यावर संशोधन करून त्यांनी ग्रंथ लिहीले. मात्र शासन व पुरातत्व विभागाने मात्र या ऐतिहासिक व पौराणिक धरोवराकडे सपशेल दुर्लक्ष केले.
हे ग्रंथ गोविंद प्रभूकालीन आहेत. ४०० वर्षांपूर्वी ऋषिमुनी त्यांचेकडील तयार केलेल्या कागदावर धर्मग्रंथाचे लिखाण करीत होते. अशा प्रकारचे शेकडो ग्रंथ श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील महंत गोपीराज शास्त्री यांच्या ग्रंथालयात पाहावयास मिळतात. यात ५०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेले ‘लीळाचरित्र’ जे पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन भागात आहे. महंताच्या दिलेल्या माहितीनुसार एकूण ३५० धर्मग्रंथ आहेत. या ग्रंथाचे जतन करण्याचे प्रयत्न याच ग्रंथालयातून होत आहे. यासाठी कोणाचीही मदत मिळाली नाही व तशी विनंतीही गोपीराज महंतांनी केली नाही.
भगवान चक्रधर स्वामी यांनी े जे उपदेश केले याची नोंद अमेरिकेच्या लेडी एनफिल्ड हाऊस यांनी आपल्या ‘दि डिईडस् आॅफ गार्ड इन रिद्धपूर’ या पुस्तकात केली असून याचे प्रकाशन ‘आॅक्सफोर्ड युनिव्हरसिटी’ येथे झाले होते. रशियाचे डॉ. इ. एन. रिसाईट यांनी या ग्रंथाचे संशोधन करून ग्रंथ लिहिला. १९८२ मध्ये डॉ. व्ही. बी. कोलते यांनी ‘लिळाचरित्र’ लिहिले. त्यानंतर डॉ. पुरुषोत्तम नागापूरे यांनीही याचा अनुवाद केला. हिंगोली जिल्ह्यातील बोराळा येथील बी. जी. जाधव यांनी सुद्धा लिळाचरित्राचा अनुवाद लिहिला.

Web Title: Rarer texts, foreign writers' research on fractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.