रसगुल्ला तोंडात... आणी कोरोना लस दंडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:37+5:302021-09-12T04:16:37+5:30

फोटो - कॅप्शन आरोग्य कर्मचारी शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना व्यक्तींचे लसीकरण करताना. लोकमत विशेष नरेंद्र जावरे - परतवाडा : ...

Rasgulla in the mouth ... and Corona vaccine in fine | रसगुल्ला तोंडात... आणी कोरोना लस दंडात

रसगुल्ला तोंडात... आणी कोरोना लस दंडात

Next

फोटो - कॅप्शन आरोग्य कर्मचारी शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना व्यक्तींचे लसीकरण करताना.

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - परतवाडा : इंजेक्शनचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु, कोरोनामुळे सर्वांनाच मनाची तयारी नसतानाही लसीकरणासाठी तयार व्हावेच लागले. तथापि, लसीकरण घेताना अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग गतिमंद अंध मुलांना मात्र रसगुल्ला तोंडात आणि पटकन व्हॅक्सिन दंडात असा प्रयोग करावा लागला. आरोग्य विभागाने गुरुवारी दुसऱ्यांदा लसीकरण करताना ही ‘गोड’ कसरत केली.

वझ्झर येथी स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मूक-बधिर, मतिमंद बालगृहात ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या ६४ दिव्यांग मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण गुरुवारी करण्यात आले. धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येथे शिबिर लागले होते.

वैद्यकीय अधिकारी पूनम मोहोकार, आरोग्य सेविका तथा लसटोचक मुक्ता केंद्रे, आरोग्य सेवक देवेंद्र संभे, समुदाय आरोग्य अधिकारी मोनिका आठोले आदींनी सहभाग घेतला होता.

बॉक्स

तोंडात रसगुल्ला

दिव्यांग मुलांचे लसीकरण कसे होणार? कारण मुलाने हात जरी हलवला किंवा इंजेक्शन देताना काही हालचाल केली तरी मोठी दुखापत होण्याची भीती होती. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनासुद्धा तीच काळजी होती. त्यावरच शंकरबाबांनी स्वतः उपाय शोधला. लसीकरणादरम्यान रसगुल्ला, मिठाई बोलावली आणि तोंडात रसगुल्ला टाकताच दुसरीकडून इंजेक्शन टोचले जायचे. त्यामुळे अगदी शांततेत हे लसीकरण गुरुवारी दुसऱ्यांदा पार पडले.

बॉक्स

ना ताप, ना कोरोना ....

कोरोनाकाळात वझ्झर येथील बाल सुधारगृहात आरोग्य कर्मचारी वगळता सर्वांसाठी प्रवेश निषेध करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात शंकरबाबांच्या या दिव्यांग मुलांना कोरोना अजून शिवला नाही. इंजेक्शन दिल्यानंतर एकाही मुलाला ताप आला नसल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात. दुसरीकडे बालगृहापासून अगदी हाकेच्या अंतरावर समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळेत कोरोना विलगीकरण केंद्र होते. परंतु या परिसरात शंकरबाबांनी येण्यास सर्वांना सक्त मनाई केली होती, हे विशेष.

बॉक्स

२५ एकरात हजारो वृक्ष

स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात या परिसरातील २५ एकर जागेवर हजारो विविध प्रजातींचे वृक्ष लावण्यात आली आहेत शंकर बाबांची गतिमंद मुलं ऑक्सीजन देणाऱ्या अनेक वृक्षांची लागवड त्याची देखभाल पाणी टाकन्याचे कार्य करीत असल्याचे शंकरबाबा अभिमानाने सांगतात परिसरच ऑक्सिजन युक्त आहे

कोट

दिव्यांग मुलांना जगविण्याची धडपड सुरू आहे कोरोनाचा शिरकाव माझ्या मुला पर्यंत पोहोचू दिला नाही त्यासाठी आजही कटाक्षाने काळजी घेतल्या जात आहे कोरोना लसीकरणासाठी तोंडात रसगुल्ला किंवा मिठाई देऊन यशस्वी अशी ही मोहीम आम्ही आरोग्य कर्मचारी डॉक्टरांच्या सहकार्याने पूर्ण केली

शंकरबाबा पापळकर

ज्येष्ठ समाजसेवक

वझ्झर अचलपूर

कोट

दिव्यांग मुलांना लसीकरण करण्यासाठी खूप त्रास होईल ही मनात भीती होती परंतु बाबा व आम्ही रसगुल्ला आणि मिठाईच प्रयोग करीत

लसीकरण दुसऱ्या टप्प्यात यशस्वी केले

मुक्ता केंद्रे

आरोग्य सेविका (लसटोचक)

आरोग्य केंद्र धामणगाव गढी

अचलपूर

[15:32, 10/09/2021] Narendra Jaware: कु प्रमिला नघाटे अधिक्षिका, वर्षा काळे,सुभाष काळे, कृष्णा पवार, अनिल, पदमा, ममता ,पींटो ,वैशाली, अमीत

वझ्झर येथील कर्मचारी उपस्तीत होते नाव उपरोक्त टाकणे

Web Title: Rasgulla in the mouth ... and Corona vaccine in fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.