रश्मी पाटीलला शिक्षणासाठी दिले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:22 PM2018-07-25T22:22:10+5:302018-07-25T22:22:32+5:30

येथील विद्यार्थिनी रश्मी पाटील हिला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने शिक्षणासाठी आर्थिक बळ दिले. तिला ७५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. या कार्यात स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेने परिश्रम घेतले.

Rashmi Patil's strength for education | रश्मी पाटीलला शिक्षणासाठी दिले बळ

रश्मी पाटीलला शिक्षणासाठी दिले बळ

Next
ठळक मुद्देश्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार : ७५ हजारांचे आर्थिक साहाय्य, शिवाजी शाळेचे परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : येथील विद्यार्थिनी रश्मी पाटील हिला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने शिक्षणासाठी आर्थिक बळ दिले. तिला ७५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. या कार्यात स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेने परिश्रम घेतले.
स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी रश्मी विनोद पाटील हिने २०१७-१८ मध्ये झालेल्या शालांत परिक्षेमध्ये ९८ टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. मात्र, कोचिंगसह पुढील वाटचालीसाठी इतर खर्च आवाक्यातील नव्हता. शाळेतील शिक्षकांना याची जाणीव होताच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. प्रचंड बुद्धिमत्ता व पुढील शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती असल्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व संपूर्ण कार्यकारिणी आणि शिवाजी शाळेच्या सहकार्याने तिला ७५ हजार रुपयांची भरीव मदत देण्याचे ठरले. स्व. अण्णासाहेब कानफाडे शिवाजी रंगमंदिरात मंगळवारी रश्मी पाटील हिचे आजोबा बाबूराव पाटील, वडील विनोद पाटील व आई वैशाली पाटील यांना ही रोख रक्कम हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला नरेशचंद्र ठाकरेंसह शाळा समिती सदस्य एन.एस. गावंडे, आजीवन सदस्य प्रभाकरराव पाटील, दिनेश अर्डक, गुलाबराव पारधी, वामनराव बिडकर, सुभाषराव पावडे, मुख्याध्यापक व्ही.डी. खोरगडे, पर्यवेक्षक व्ही.पी. केने, सुरेश गुर्जर उपस्थित होते.

Web Title: Rashmi Patil's strength for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.