ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात

By उज्वल भालेकर | Published: February 3, 2024 09:11 PM2024-02-03T21:11:41+5:302024-02-03T21:12:03+5:30

राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा राष्ट्रधर्म युवा मंचचा प्रयत्न

Rashtrasant Shri Tukdoji Maharaj Sahitya Sammelan started with Granthdindi | ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात

ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरणनिमित्त शहरातील शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला सुरुवात शनिवारी झाली. या राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. अभियंता भवन येथून या ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची समाधी तसेच पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडी कार्यक्रमस्थळी पोहोचली. दोन दिवसीय या साहित्य संमेलनामध्ये विविध विषयांवर परिसंवादही आयोजित केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय, सामाजिक तथा सर्वांगीण साहित्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, या उद्देशाने राष्ट्रधर्म युवा मंचच्यावतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

शनिवारी या साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ संत साहित्यिक व विचारवंत बाभूळगावकर शास्त्री, उद्घाटक म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज इंगळे, अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, स्वागताध्यक्ष रघुनाथ वाडेकर, आ.ॲड. यशोमती ठाकूर, लक्ष्मणराव गमे, अशोक आत्राम, नामदेव महाराज गव्हाळे, लक्ष्मणदास काळे महाराज. सतीश तराळ, भरत रेडे, लक्ष्मण गाले, प्रकाश तारेकर, ज्ञानेश्वर निस्ताने, अरविंद काळमेघ, अयजसिंह चौव्हाण, प्रमोद खर्चान यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. संचालन श्रीकृष्ण पखाले, मयूर वानखडे यांनी केले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी भजनसंध्या आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, तर रविवारी विविध विषयांवर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Rashtrasant Shri Tukdoji Maharaj Sahitya Sammelan started with Granthdindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.