राष्ट्रसंताचा पुण्यतिथी महोत्सव ला आजपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:28 AM2024-10-15T11:28:56+5:302024-10-15T11:32:18+5:30
Amravati : मौन श्रद्धांजली २१ ऑक्टोबर रोजी
मनीष तसरे
अमरावती: संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज पासून गुरुकुंज आश्रमात प्रारंभ झाला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम यांनी या महोत्सवाचे जय्यत तयारी केली आहे सात दिवसीय महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना, चिंतन ग्रामसफाई,प्रवचन,कीर्तन, संमेलन भजन संध्या, खंजरी भजन, योगासन शिबिर,वक्तृत्व स्पर्धा, ग्रामगीताचार्य पदवी प्रदान समारंभ, कार्यकर्ता संमेलन महिला मेळावा, अभंग गायन होईल.
सामुदायिक प्रार्थना विश्वशांतीचा महामंत्र या विषयावरील परिसंवादात विदेशी भावीक सहभागी होणार आहे. मौन श्रद्धांजली २१ ऑक्टोबर रोजी वाहिली जाईल.आज पहाटे चार वाजता तीर्थ स्थापना चरणपादुका व महासमाधी पूजनाने या महोत्सवाची सुरुवात झालेली आहेत. सकाळी सामुदायिक झाल्यानंतर गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंताच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यात विविध भजनी मंडळ सहभागी झाले होते.