राष्ट्रसंतांची जन्मभूमी ते कर्मभूमी रस्ता खड्ड्यांनी ‘समृद्ध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:01 PM2019-01-05T22:01:15+5:302019-01-05T22:01:58+5:30
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता जड व अवैध वाहतुकीच्या वजनाने खाचखळग्यांनी समृद्ध झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंतांच्या दोन्ही पावन स्थळांना भेटीस येणाºया गुरुदेवभक्तांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरला आहे.
गुरूकुंज (मोझरी) : मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता जड व अवैध वाहतुकीच्या वजनाने खाचखळग्यांनी समृद्ध झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंतांच्या दोन्ही पावन स्थळांना भेटीस येणाºया गुरुदेवभक्तांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरला आहे.
अमरावती तालुक्यात येणाºया यावली शहीद या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी दररोज गुरुदेवभक्तांची रेलचेल असते. येथूनच गुरुदेवभक्त राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीला भेट देण्याकरिता जातात. त्या ठिकाणी महासमाधी, प्रार्थना मंदिर, ध्यानयोग मंदिर, दास टेकडी आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. या दोन्ही गावांना जोडणाºया रस्त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो. नववर्ष आणि हिवाळा याचा संयोग साधून अनेक पर्यटक आणि भविक भक्त या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेटी देत आहेत.
यावली शहीद ते गुरुकुंज मोझरी रस्त्याची नेहमीच डागडुजी करण्यात येते. पण, त्याने रस्ता गुळगुळीत न होता, संपूर्ण रस्ताच खाचखळग्यांचा झाला आहे. या स्त्याचे नूतनीकरण करून भाविकांची गैरसोय टाळण्याची मागणी होत आहे. गौण खनिज वाहतुकीने रस्त्याचे वाभाडे निघाले आहेत. दररोज शेकडो ट्रकच्या माध्यमातून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची दिवसा व रात्रीदेखील ओव्हरलोड वाहतूक होते. याच रस्त्याने अवैधरीत्या पाळीव जनावरांची वाहतूक, लाकूडफाटा यांची वाहतूक बिनबोभाट होते. त्यामुळे खºया अर्थाने रस्त्याची वाताहत झाली. या रस्त्याची दुरुस्ती विनाविलंब व्हावी, अशी अपेक्षा आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी ही तिवसा तालुक्यात येते, तर कर्मभूमी अमरावती विभागात येते. आमच्या हद्दीतील अडीच किलोमीटर रस्ता उत्तम असून, गुळगुळीत आहे
- दिनकर माहोरे,
उपविभागीय अभियंता,तिवसा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीपर्यंत येणारा रस्ता उत्तम असावा, याबाबत दोन्ही सरपंचांचे एकमत आहे. ५० व्या पुण्यतिथीआधी हे काम पूर्ण झाले नाही, ही खेदाची बाब आहे.
- पांडुरंग मक्रमपुरे,
सरपंच, गुरुदेवनगर