खासगी रुग्णालयातील म्युकरमायकोसिस उपचारांचे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:14 AM2021-06-09T04:14:57+5:302021-06-09T04:14:57+5:30

अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे म्युकरमायकोसीस रुग्णांकडून आकारले जाणारे जास्तीत जास्त दर निश्चितीबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली ...

The rate of treatment of myocardial infarction in a private hospital is fixed | खासगी रुग्णालयातील म्युकरमायकोसिस उपचारांचे दर निश्चित

खासगी रुग्णालयातील म्युकरमायकोसिस उपचारांचे दर निश्चित

Next

अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे म्युकरमायकोसीस रुग्णांकडून आकारले जाणारे जास्तीत जास्त दर निश्चितीबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही खासगी रुग्णालयाला कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. यासंदर्भाचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी जारी केला

महानगरपालिका क्षेत्रातील ब वर्ग शहराकरिता तसेच मनपाक्षेत्र वगळून संपूर्ण जिल्ह्यासाठी सामान्य वार्डासाठी आयसोलेशन वार्डासह तीन हजार रुपये शुल्क, व्हेंटीलेटर वगळून आयसीयू व आयसोलेशन वार्डसाठी रुपये ५,५०० रुपये, व्हेंटीलेटरसह आयसीयू व आयसोलेशन वार्डसाठी ६,७०० रुपये शुल्क आकारण्यात यावे. यामध्ये मॉनिटर, सीबीसी, युरीन रुटीन, एचआयव्ही स्पॉट ॲन्टी एचसीव्ही, एचबीएस सीरम क्रेटीनाईन, युएसजी, युएसजी, २ डी इको, एक्स रे, ईसीजी, ड्रग्स, ऑक्सिजन चार्जेस, फिजीसिएन कंन्सलटेशन चार्जेस, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, रायल्स ट्युब इनसरशन, युरिनरी ट्रॅक्ट कॅशेटरायझेन, ब्लड प्राड्क्टस्, आयव्ही फ्युल्ड्स आदी चाचण्या व तपासण्यांचा समावेश असेल. उपरोक्त दरापेक्षा जास्त आकारणी करणारे व्यवस्थापन किंवा खाजगी हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: The rate of treatment of myocardial infarction in a private hospital is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.