राज्यातील केशरी कार्डधारक १९ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:30 PM2017-12-02T14:30:12+5:302017-12-02T14:31:27+5:30

सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

Ration of 19 lakh farmers for cashless card holders in the state at subsidized rates | राज्यातील केशरी कार्डधारक १९ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन

राज्यातील केशरी कार्डधारक १९ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन

Next
ठळक मुद्देप्रतिव्यक्ती पाच किलो धान्यशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना

गजानन मोहोड।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वऱ्याडात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ हजार ५५५ शेतकऱ्यांना ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्य वितरणाचे लक्ष्य होते.
अमरावती, औरंगाबाद विभागासह नागपूर जिल्ह्यातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण १३ जिल्ह्यांसाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याचा पुरवठा होत आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये जे लाभार्थी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ च्या अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींच्या परिमाणात लाभ दिला जात आहे. अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ लाख शेतकऱ्यांसाठी ६ हजार ६०६ मेट्रिक टन गहू, २ हजार ९४८ मेट्रिक टन तांदूळ असे एकूण ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर करण्यात आले. ९ हजार ३९९ मेट्रिक टन धान्य उचल करण्यात येऊन ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले. वाटपाची ही ७४ टक्केवारी आहे.

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख लाभार्थी
विभागात या योजनेसाठी १९ लाख ३९ हजार लाभार्थींपैकी सर्वाधिक ६ लाख ३ हजार ३३२ अमरावती जिल्ह्यातील आहेत. येथे नोव्हेंबर महिन्यात २२२७ मेट्रिक टन धान्यवाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ९३० लाभार्थींना ६७१ मेट्रिक टन, वाशिम जिल्ह्यात २ लाख ४६ हजार ९५७ लाभार्थींना ११४६ मेट्रिक टन, बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार १२१ लाभार्थींना ९७५ मेट्रिक टन व यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार २१५ लाभार्थींना २००४ मेट्रिक टन रेशन धान्याचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.

विभागातील १९ लाख ३९ हजार लाभार्थींना सवलतीच्या दरात रेशन धान्याचे वाटप करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे आवंटन मंजूर होते. पैकी ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले.
- रमेश मावस्कर
उपायुक्त (पुरवठा)

Web Title: Ration of 19 lakh farmers for cashless card holders in the state at subsidized rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.