रेशन दुकानदार कार्यालयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:25 PM2019-01-31T23:25:00+5:302019-01-31T23:25:45+5:30

जिल्हाभरात मागील मे महिन्यापासून एईपीडीएस प्रणाली लागू केली आहे. रेशन दुकानदारांना शासकीय धान्य आॅनलाईन पद्धतीने वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय सोपस्कार केल्यानंतरही पॉस मशिनवर आरसी नंबर ओपन होत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे मॅन्युअल धान्य वितरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गुरूवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती तालुक्यातील रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Ration shopkeeper office | रेशन दुकानदार कार्यालयी

रेशन दुकानदार कार्यालयी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : समस्यांकडे यशोमती ठाकूर यांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाभरात मागील मे महिन्यापासून एईपीडीएस प्रणाली लागू केली आहे. रेशन दुकानदारांना शासकीय धान्य आॅनलाईन पद्धतीने वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय सोपस्कार केल्यानंतरही पॉस मशिनवर आरसी नंबर ओपन होत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे मॅन्युअल धान्य वितरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गुरूवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती तालुक्यातील रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
रेशन दुकानदारांनी पुरवठा विभागाचे आदेशानुसार सर्व शिधापत्रिका धारकांचा डाटा एन्ट्री समाविष्ट करण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले नाही. बरेच कार्डधारकांचे आरसी नंबन पॉस मशिनवर अद्यापही ओपन होत नाही. यावर पर्याय म्हणून अशा कार्डधारकांना धान्य वितरित करताना शिधापत्रिका, आधारकार्ड प्रत, शासकीय ओळखपत्र, बँकेचे पासबुक आदी घेऊन मॅन्युअल धान्य वाटपाची परवानगी देण्याची मागणी रेशन दुकानदारांच्यावतीने आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यासोबतच रेशन कार्डधारकाना त्यांच्या आरसी नंबरवर नियमित धान्य वितरित करताना एखाद्या महिन्यात अशा रेशन कार्डधारकाची आरसी पॉस मशिनवर उघड होत नाही, अशा स्थितीत संबंधित कार्डधारकाला धान्यापासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून गावात वाद उपस्थित होत आहे. त्यामुळे यावर पर्यायी व्यवस्था करावी, स्वस्त धान्य दुकानदाराला मासिक मंजूर कोटा महिन्याच्या १ तारखेपासून निर्धारित होण्याची प्रक्रिया महिन्याअखेरपर्यंत चालते. त्यामुळे अमरावती तालुक्यातील रेशन दुकानदारांना शासकीय गोदामातून वितरणाचे धान्य ३० तारखेला पोहचते. त्यामुळे उर्वरित कार्डधारकांना पॉस मशिनव्दारे धान्य वितरण शक्य होत नाही. एकाच वेळी लाभाधारक मोठ्या संख्येने येतात व नेटवर्कची अडचण येते व दुकानदारांसोबत वाद उदभवतात. त्यामुळे मॅन्युअल धान्य वितरणाशिवाय पर्याय नाही. याबाबतही विचार व्हावा आदी मागण्यांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठपुरावा करून तोडगा काढण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिले. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे, कमलेश तायडे, नवलकिशोर बंग, ए.डी.दहीकर, पदमाकर शेळके, पी.एम.इंगळे, जे.ए.जयस्वाल, जितेंद्र सरदार, प्रकाश राऊत, अशोक भलावी व रेशन दुकानदार सहभागी झाले होते.
तिवसा तहसीलदारांची तक्रार
तिवसा येथील नायब तहसीलदार चौधरी यांच्याकडून रेशन दुकानदारांसोबतच नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय तहसीलमध्ये कामे होत नाही, अशी तक्रार आ.यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात गोडावून तपासणीकरिता आलेल्या राज्यपातळीवरील पथकासोबत रेशन दुकानदारांचा संबंध नसताना दुकानदारांकडून पुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांकडून पैसे वसुली केल्याचीही तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आश्वासन रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश उल्हे यांना जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिले.

मॅन्युअल धान्य वितरणातील रेशन दुकानदारांच्या अडचणीबाबत अन्नपुरवठा मंत्री व सचिव यांच्याकडे स्वत: पाठपुरावा करू. त्यांना याबाबत प्रत्यक्ष भेटून अवगत करण्यात येईल. यावर योग्य तोडगा काढण्यात येईल.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा

Web Title: Ration shopkeeper office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.