धामणगावात रतन जिनिंगला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:22 PM2018-03-05T22:22:20+5:302018-03-05T22:22:20+5:30
कापूस घेऊन आलेल्या एका पिकअप वाहनातून निघणाºया धुराने कापसाला आग लागली. त्यामुळे जिनिंगमध्ये साठविलेल्या ५०० क्विंटल कापसाची गंजी आगीच्या विळख्यात सापडले.
धामणगाव (रेल्वे) : कापूस घेऊन आलेल्या एका पिकअप वाहनातून निघणाºया धुराने कापसाला आग लागली. त्यामुळे जिनिंगमध्ये साठविलेल्या ५०० क्विंटल कापसाची गंजी आगीच्या विळख्यात सापडले. ही घटना सोमवारी सायंकाळी येथील एका जिनिंगमध्ये घडली. यामध्ये तब्बल २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
यवतमाळ रस्त्यावर श्रीरतन जिनिंग प्रेसिंग असून यात सर्व सुविधायुक्त अग्निरोधक यंत्रणा आहे़ मात्र, वाहनातून अचानक धूर निघून थेट कापसाच्या गंजीला आग लागल्यामुळे कापूस जळून खाक झाला़ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली़ बाजूलाच तब्बल अडीच हजार क्विंटल कापसाची गंजी होती ही आग आटोक्यात आली नसती, तर मोठी हानी झाली असती, अशी माहिती रतन जिनिंगचे संचालक रवि भुतडा यांनी दिली़