राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘रावण’चाच बोलबाला; दोन दिवसांत दीड लाख शेतकरी, नागरिकांच्या भेटी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 29, 2023 08:47 PM2023-12-29T20:47:35+5:302023-12-29T20:47:48+5:30

१०० एकर परिसर, ५१२ स्टॉल्स

'Ravan' dominates the National Agricultural Exhibition; 100 acres area, 512 stalls | राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘रावण’चाच बोलबाला; दोन दिवसांत दीड लाख शेतकरी, नागरिकांच्या भेटी

राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘रावण’चाच बोलबाला; दोन दिवसांत दीड लाख शेतकरी, नागरिकांच्या भेटी

अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त १०० एकर परिसरात राष्ट्रीय कृषी प्रदर्शन सध्या सुरू आहे. यामध्ये तब्बल ५१२ स्टॉल्स शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. दोन दिवसांत १.२० लाखाच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील चरा वर्षाचा, आठ फूट लांब, ६.२ फूट उंची व एक टन वजनाच्या लाल कंधारी ‘रावण’ हा वळू लक्षवेधी ठरला आहे.

भारत स्वतंत्र होऊन जेमतेम कारभाराला सुरुवात झाली असतानाच देशाचे प्रथम कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९५९-६० मध्ये दिल्ली येथे पहिले जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले होते. त्याचीच आठवण म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा येथील कृषी महाविद्यालयात २७ ते ३० डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रा. सी. एम. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: 'Ravan' dominates the National Agricultural Exhibition; 100 acres area, 512 stalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.