विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रावण दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:38 AM2018-10-05T01:38:20+5:302018-10-05T01:39:33+5:30

विश्व हिंदू महासंघ व रावण दहन आयोजन समितीच्यावतीने १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रावणाच्या ४० फुटांच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. ही माहिती समितीचे कार्याध्यक्ष तथा विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

Ravana combustion by World Hindu Federation | विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रावण दहन

विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रावण दहन

Next
ठळक मुद्देपत्रपरिषद : ४० फुटांची प्रतिमा उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विश्व हिंदू महासंघ व रावण दहन आयोजन समितीच्यावतीने १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रावणाच्या ४० फुटांच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. ही माहिती समितीचे कार्याध्यक्ष तथा विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
२८ वर्षांपासून बंद पडलेल्या रावण दहनाच्या उत्सवाला मागील वर्षांपासून विश्व हिंदू महासंघ व रावण दहन आयोजन समितीने पुन्हा सुरू केले आहे. मागील वर्षी रावणाची ५१ फुटांची प्रतिमा तयार केली होती. मात्र, मैदानाची क्षमता लक्षात घेता व त्यापासून नागरिकांना कुठलाही धोका पोहोचू नये, याकरिता यंदा ४० फुटांच्या प्रतिमेचे दहन १८ आॅक्टोबरला केले जाणार आहे. कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखविण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा जोपासण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. प्रतिकात्मक दहन केले जाणार आहे. प्रत्येकाने आपला अहंकार जाळून टाकावा एवढाच उद्देश आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यादरम्यान भव्य आतषबाजी केली जाणार आहे. शहरवासीयांनी या आयोजनाला उपस्थित राहावे, असे आवाहनदेखील करण्यात आले.
पत्रपरिषदेला नितीन धांडे, आशिष राठी, हेमेंद्र जोशी, समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Ravana combustion by World Hindu Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.