रवि राणा एसीपी कार्यालयात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 AM2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:42+5:30

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून ९ फेब्रुवारीला राजापेठ पोलिसांनी आ. रवि राणा, तीन महिला व अन्य ७ अशा एकूण ११ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३५३, १२० ब असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पैकी पाच जणांना अटक करण्यात आली, तर महिलांसह आ. राणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर राणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्यानुसार ५ एप्रिलला तपासकामी उपस्थित राहण्याची नोटीस राणा यांना बजावण्यात आली होती.

Ravi Rana attends ACP office | रवि राणा एसीपी कार्यालयात हजर

रवि राणा एसीपी कार्यालयात हजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आयुक्तांवरील शाईफेक व जीवघेणा हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आमदार रवि राणा हे गुरुवारी दुपारी १.१० च्या सुमारास राजापेठ सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात हजर झाले. शहर कोतवाली ठाण्यालगत असलेल्या कार्यालयात एसीपी भारत गायकवाड यांनी राणा यांचे बयाण नोंदवून घेतले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. बयाण आटोपून आ. राणा दुपारी ३.२५ च्या सुमारास एसीपी कार्यालयातून बाहेर पडले.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून ९ फेब्रुवारीला राजापेठ पोलिसांनी आ. रवि राणा, तीन महिला व अन्य ७ अशा एकूण ११ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३५३, १२० ब असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पैकी पाच जणांना अटक करण्यात आली, तर महिलांसह आ. राणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर राणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्यानुसार ५ एप्रिलला तपासकामी उपस्थित राहण्याची नोटीस राणा यांना बजावण्यात आली होती. मात्र, आपण दिल्लीला असल्याने ७ एप्रिलला  उपस्थित राहू, असे पत्र आ. राणा यांच्याकरवी पाठविण्यात आले होते. त्यानुसार आ. राणा हे गुुरुवारी दुपारी वकिलांसह एसीपीसमक्ष उपस्थित झाले. भारत गायकवाड यांनी राणा यांना विविध प्रश्न विचारले. 

डीसीपी साळींनी घेतला आढावा
सकाळी ११ च्या सुमारास एसीपी कार्यालय गाठून पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी एसीपी भारत गायकवाड व राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याशी चर्चा केली. सुमारे दोन तास तेथे थांबत साळी यांनी अधीनस्थ यंत्रणेला दिशानिर्देश दिले. त्यांच्याच आदेशानुसार, शहर कोतवाली व एसीपी कार्यालय परिसरात बॅरिकेडिंग व बंदोबस्त लावण्यात आला.

कोतवाली पोलिसांचे वाहन भर रस्त्यात 
कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज व त्यांचे सर्व सहकारी एसीपी कार्यालय व ठाण्याच्या परिसरात असताना भोंगा असणारे पोलिसांचे चारचाकी वाहन रॉंग साईडने एसीपी कार्यालयासमोरच्या मार्गावर आणण्यात आले. तेथून कलम १४४ ची उद्घोषणा करण्यात आली. त्यावेळी श्याम चौकाकडून, राजकमलकडून पुढे जयस्तंभ चौकमार्गे वाहतूक सुरू असताना पोलिसांचे ते वाहन तब्बल अर्धा तास रॉंग साईडने रस्त्यावर उभे होते. त्यामुळे वाहनचालकांना काहीकाळ त्रास सहन करावा लागला.

कोतवाली ठाणे परिसरात कलम १४४ जारी 
आमदार रवि राणा हे शहर कोतवालीनजीकच्या राजापेठ सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात येणार असल्याने त्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कलम १४४ लागू करण्यात आल्याची घोषणा दुपारी बाराच्या सुमारास भोंग्याद्वारे करण्यात आली. शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. उड्डाणपूल परिसरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली. राणा निघून गेल्यानंतर स्थिती पूर्वपदावर आली.

गुन्हा दाखल झाला, तेव्हा मी दिल्लीत होतो. माझ्यावर व माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ. मात्र, तत्पूर्वी पोलिसांना तपासकामी पूर्ण सहकार्य करू. सीपींना कायदेशीर उत्तर देऊ.
- रवि राणा, आमदार, बडनेरा

 

Web Title: Ravi Rana attends ACP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.