मध्य रेल्वे महाप्रबंधकांची रवि राणा यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:38 PM2018-12-28T22:38:08+5:302018-12-28T22:39:02+5:30
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यासाठी आले असता, आ. रवि राणा यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध कामांवर चर्चा केली.
अमरावती : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यासाठी आले असता, आ. रवि राणा यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध कामांवर चर्चा केली.
राजापेठ फ्लायओव्हरचे काम थांबले आहे. नागरिकांना ते अडचणीचे ठरत आहे. ते काम लवकर सुरू करावे व त्याला गती द्यावी. बडनेऱ्यात वॅगन कारखान्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्याला गती द्यावी तसेच वॅगन कारखान्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत, त्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी. बडनेरा रेल्वे स्थानक मॉडेल स्थानकासारखे बनवावे आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावर ओव्हरब्रिज आहे. तो दुपदरी आहे. त्याला चारपदरी करण्यात यावे. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा. शकुंतला रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात यावे, अशी मागणी आ. रवि राणा यांनी चर्चेदरम्यान मांडली. यावेळी सिद्धार्थ बनसोड, अजय जयस्वाल, विलास वाडेकर, पंकज शर्मा, राहुल काळे, सोनू गद्रे, धर्मेद्र कारेगोरे, गणेश भोयर, कृष्णराव शेगोकार उपस्थित होते.