रवी राणा यांच्यासह ३९ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:10 PM2019-03-18T23:10:56+5:302019-03-18T23:11:08+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सन २०१२ बडनेºयाचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर जाळपोळ करून रास्ता रोको केला होता. आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी ३९ शेतकºयांसह आ. रवि राणा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक न्यायालयाने १८ मार्च रोजी या प्रकरणात आ. राणा यांच्यासह ३९ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सन २०१२ बडनेºयाचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर जाळपोळ करून रास्ता रोको केला होता. आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी ३९ शेतकºयांसह आ. रवि राणा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक न्यायालयाने १८ मार्च रोजी या प्रकरणात आ. राणा यांच्यासह ३९ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.
२०१२ मधील आंदोलनादरम्यान एसटी बसची तोडफोड झाल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता. तिवसा पोलीस ठाण्यात आ. राणा यांच्यासह ३९ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम १४३, १४१, १४९, ४२७, ३४१ सह शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनास्थळावरून त्यांना अटक करून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
प्रकरणावर तब्बल सात वर्षे तिवसा न्यायालयात सुनावणी सुरू होती. यात सरकारतर्फे आठ जणांचे बयान नोंदविण्यात आले.
तिवसा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एन. गिरवलकर यांनी ठोस पुरावे नसल्याने सोमवारी आ. रवि राणा यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली. बचाव पक्षाच्यावतीने अॅड. आशिष लांडे यांनी बाजू मांडली.
आंदोलनादरम्यान झालेले नुकसान व दंडाची ५०० रुपये रक्कम न भरल्याने न्यायालयाकडून आ. रवि राणा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना डिसेंबर २०१२ मध्ये तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.