रवि राणा यांचा कोविड रुग्णांशी संवाद, आस्थेने विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:45+5:302021-06-05T04:10:45+5:30

ग्रामीण भागात भेटी, पीएम केअर निधीतील ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी अमरावती : आमदार रवि राणा यांनी ग्रामीण भागात कोविड रुग्णालयांना ...

Ravi Rana's interaction with Kovid patients | रवि राणा यांचा कोविड रुग्णांशी संवाद, आस्थेने विचारपूस

रवि राणा यांचा कोविड रुग्णांशी संवाद, आस्थेने विचारपूस

Next

ग्रामीण भागात भेटी, पीएम केअर निधीतील ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी

अमरावती : आमदार रवि राणा यांनी ग्रामीण भागात कोविड रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांशी संवाद साधला आणि आस्थेने विचारपूस केली. यादरम्यान आ. राणांनी अपुरे व अस्वच्छ बेड, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे, निकृष्ट दर्जाचे भोजन यात सुधारणा करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला केल्या.

अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालय, क्वारंटाईन सेन्टर, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, बुरडघाट क्वारंटाईन सेन्टरची पाहणी आ. रवि राणा यांनी केली. कोविड रुग्णांना उपचार, सुविधा व्यवस्थित देण्यासाठी तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. कंत्राटी डॉक्टर, आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षकांचे अपुरे वेतन, कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून लूट याकडे आमदार राणांनी आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कोविड रुग्णालयात थेट पोहोचून रुग्णांशी संवाद आणि आस्थेने विचारपूस केल्याबाबत नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडीअडचणी आमदारांनी जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कामलकांत लाडोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रहाटे, डॉ. डोंगरे, जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बचले, अचलपूर संपर्कप्रमुख बंटी केजरीवाल, राजू लोहिया, मनीष अग्रवाल, तालुकाध्यक्ष रवि गवई, पुरुषोत्तम बोरेकर, अनुराग चांदनानी, वैभव गोस्वामी उपस्थित होते. दरम्यान आमदार राणांच्या पुढ्यात युवा स्वाभिमानचे पदाधिकारी मंगेश कोकाटे, अजय देशमुख, विठ्ठल ढोले, सुहास मोरे, अमोल दाभाडे, नीलेश देशमुख, दशरथ येवले, मोहम्मद तौसिफ, लीलाबाई डिके, पवन गुहे, महेंद्र भगत यांनी तक्रारीचा पाढा वाचला.

-------------------

पीएम निधीतून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प

खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून पीएम केअर निधीतून अमरावती शहरात जम्बो ऑक्सिजन प्रकल्प तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार बेड, व्हेंटिलेटर आदी सुविधा पुरविण्यात येईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पीएम केअर निधीतून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येईल, असे आमदार राणा यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला.

०००००००००००००००००००००००००००००००

(स्वतंत्र बातमी घेणे) फाेटो घेणे

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस त्वरित सुरू करा

रेल्वे सल्लागार समिती भुसावळ रेल्वे नितीन बोरेकर

बडनेरा : रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्यात यावी, अशी मागणी मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे मंडळ प्रबंधक विवेक गुप्ता यांच्याकडे डीआरयूसीसी सदस्य नितीन बोरेकर यांनी केली. गुरुवारी गुप्ता हे बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ही मागणी मांडण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी अमरावती रेल्वे स्थानकावरील १०० फूट उंच राष्ट्रध्वज काही कारणास्तव उतरविण्यात आला होता. हा राष्ट्रध्वज लवकरात लवकर पुन्हा फडकविला जावा. अमरावती रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मचे एक्स्टेंशन करावे व बडनेऱ्यात पाचबंगलाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भुयारी मार्ग बनवून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नितीन बोरेकर, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, झेडआरयूसी सदस्य अजय जैस्वाल, नानकराम नेबणानी, डीआरयूसीसी सदस्य प्रवीण साळवे, विलास वाडेकर, अयूब खान, आफताब खान, शुभम उंबरकर, पराग चिमोटे, पवन हिंगे, सचिन सोनोने, राहुल काळे, सिद्धार्थ बनसोड आदी उपस्थित होते.

Web Title: Ravi Rana's interaction with Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.