रवी राणांचे निर्विवाद वर्चस्व

By admin | Published: December 1, 2015 01:29 AM2015-12-01T01:29:20+5:302015-12-01T01:29:20+5:30

भातकुुली नगरपंचायतीसाठी यंदा प्रथमच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युवास्वाभिमानच्या महानंदा पवार

Ravi Rana's Undertaking Domination | रवी राणांचे निर्विवाद वर्चस्व

रवी राणांचे निर्विवाद वर्चस्व

Next

सेनेला हादरा : नगराध्यक्षपदी महानंदा पवार, उपाध्यक्ष गिरीश कासट
भातकुली : भातकुुली नगरपंचायतीसाठी यंदा प्रथमच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युवास्वाभिमानच्या महानंदा पवार नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी गिरीश कासट यांची निवड करण्यात आली.
१७ सदस्यीय नगरपंचायतमध्ये आ. रवी राणा यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसचे आठ नगरसेवक आहेत. दोन अपक्षही महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे स्वाभिमान काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या दहापर्यंत पोहचल्याने नगराध्यक्षपदी महानंदा पवार यांनी निवड निश्चित मानली जात होती. काँग्रेसकडे ४ नगरसेवक असून ३ नगरसेवक शिवसेनेकडे होते. सोमवारी नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भातकुलीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाला. भातकुली नगर पंचायतीची निवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती.

भातकुलीच्या नागरिकांनी युवा स्वाभिमानवर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. राजकारण न करता विकासकामालाच प्राधान्य राहील. मतदारांनी टिकाकारांना मैदान दाखविले.
- रवी राणा,
आमदार, बडनेरा.



आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
अमरावती : निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड आणि राणांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. अगदी खालच्या पातळीवर येऊन परस्परांवर बेछूट आरोप करण्यात आले. भाजपने तर प्रदेशध्यक्षांसह बड्यानेत्यांच्या प्रचारसभाही भातकुलीत लावल्या होत्या. तथापी शिवसेना भाजपचे राजकारण मोडीत निघाले आहे.

Web Title: Ravi Rana's Undertaking Domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.