रवि राणांचे मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:57 PM2017-11-11T22:57:59+5:302017-11-11T22:58:18+5:30

वनविभागाने जागा खाली करण्याच्या नोटीस बजावल्यामुळे संजय गांधीनगरात वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांवर संकट कोसळले होते.

Ravi Rane's CM accompanying the Chief Minister | रवि राणांचे मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना साकडे

रवि राणांचे मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना साकडे

Next
ठळक मुद्देघरे कायम ठेवा : वनविभागाला पर्यायी जागा द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वनविभागाने जागा खाली करण्याच्या नोटीस बजावल्यामुळे संजय गांधीनगरात वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांवर संकट कोसळले होते. याप्रकरणी आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्याची भेट घेऊन जागा कायम ठेवण्याची मागणी केली. याला मुख्यमत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गेल्या ४० वर्षांपासून संजय गांधीनगरातील रहिवासी असलेल्या नागरिकांना जागा खाली करण्याच्या नोटीस वनविभागाने बजाविल्यानंतर हजारो नागरिकांवर बेघर होण्याचे संकट कोसळले होते. जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब आ. रवि राणा यांनी गंभीरतेने घेत तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीच जागा कायम ठेवून वनविभागाला पर्यायी जागा उपलब्ध करण्याची विनंती केली. या बाबीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. याच समस्येबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली असल्याचे आ. रवि राणा यांनी सांगितले.

Web Title: Ravi Rane's CM accompanying the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.