परतवाड्यातील खासगी रुग्णालयात रुग्णांना कच्चे बिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:20+5:302021-05-25T04:14:20+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे लक्षवेध, एकाच खोलीतील तिघांना स्पेशल रूमचे भाडे फोटो पी २४ बील परतवाडा : स्थानिक भामकर कोविड रुग्णालयात ...

Raw bills for patients in private hospitals in the backyard! | परतवाड्यातील खासगी रुग्णालयात रुग्णांना कच्चे बिल !

परतवाड्यातील खासगी रुग्णालयात रुग्णांना कच्चे बिल !

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे लक्षवेध, एकाच खोलीतील तिघांना स्पेशल रूमचे भाडे

फोटो पी २४ बील

परतवाडा : स्थानिक भामकर कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांकडून अमरावतीपेक्षा अधिक बिल वसूल केले जात आहे. पक्क्या बिलाची मागणी करूनही रुग्णाला कच्चे बिल दिले जाते. २२ मे रोजी ‘लोकमत’कडे रुग्णांनी गाऱ्हाणे मांडले.

पांढरी येथील रामदास आवारे (६०) कोरोना संक्रमित निघाल्यामुळे ते १६ मे रोजी भामकर कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. २२ मेपर्यंत सात दिवस ते त्या दवाखान्यात राहिले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे बघून ते अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाले. भामकर कोविड रुग्णालय सोडण्यापूर्वी त्यांनी रुग्णालयाचे देय ५७ हजार रुपये अदा केली. त्यांना या रकमेचे विवरण एका कच्च्या कागदावर रुग्णालयाकडून दिले गेले. मागूनही पक्के बिल देण्यात आले नाही.ॉ

दरम्यान, रामदास आवारे यांना रुग्णालयातील एका खोलीत अन्य दोन रुग्णांसोबत ठेवले गेले. आवारे मिळून त्या एका खोलीत तीन रुग्ण असतानाही स्पेशल रूमचे भाडे आवारे यांच्याकडून घेतले गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांकडे रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

माहिती मिळत नाही

देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत येसुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात हे खासगी कोविड रुग्णालय मोडते. रुग्णालयात दाखल कोरोना संक्रमित आणि उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांची दैनंदिन माहिती वेळेवर संबंधिताना दिली जात नाही. यंत्रणेकडून प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतरही ती दिली गेली नाही. अखेर येसुर्णा प्राथमिक केंद्राकडून याविषयी लेखी कळविण्यात आले.

कोट

भामकर कोविड रुग्णालयात ऑक्सिजनकरिता एका खोलीत चौघांना ठेवण्यात आले होते. रुग्णालयातून सुटी घेताना तेथील व्यवस्थापनाने एका कागदावर ५७ हजार रुपयांचे कच्चे बिल दिले. १६ मे ते २२ मे दरम्यान सात दिवसांचे ते बिल आहे.

रूपा आवारे, रुग्णाच्या नातेवाईक

कोट

रुग्णाच्या किंवा नातेवाइकांच्या मागणीनुसार कोविड रुग्णालयातून पक्के बिल दिले जाते. कच्च्या कागदावर केवळ माहितीकरिता खर्चाचे विवरण दिले जाते.

डॉ. अरविंद भामकर, परतवाडा

Web Title: Raw bills for patients in private hospitals in the backyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.