‘विकेल ते पिकेल’ मोहिमेत माहुली चोर येथे रयत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:36+5:302021-06-27T04:09:36+5:30

नांदगाव खंडेश्वर : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन ...

Rayat Bazaar at Mahuli Chor in the 'Vikel to Pickel' campaign | ‘विकेल ते पिकेल’ मोहिमेत माहुली चोर येथे रयत बाजार

‘विकेल ते पिकेल’ मोहिमेत माहुली चोर येथे रयत बाजार

Next

नांदगाव खंडेश्वर : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी एका मोहिमेवर कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील गावांमध्ये होत आहे.

माहुली चोर या गावात ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत अंकुश झंझाट यांच्या शेतावर संत सावता माळी रयत बाजार अभियानामार्फत शेतकरी ते ग्राहक फळे व भाजीपाला थेट विक्री स्टॉलचे उद्घाटन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी शेतकऱ्यांना ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे सांगून यापुढील काळात शेतकऱ्यांनी गटशेतीद्वारे एकत्रित येऊन शेती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच लिंबू फळपिकासाठी धानोरा गुरव, पापळ व माहुली चोर हे महसूल मंडळ अधिसूचित झाले असल्याने या महसूल मंडळातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढावा, याविषयी माहिती दिली. यावेळी रिसोर्स बँकेतील माहुली चोर येथील प्रगतिशील शेतकरी विकास सरोदे यांनी आपल्या प्रयोगशील शेतीबाबतचे अनुभव सांगून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली व त्याबाबत कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचेही सांगितले. मंडळ कृषी अधिकारी प्रणव ठाकरे यांनी लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा डफळे यांनी केले. आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक उदय गावंडे यांनी केले. यावेळी माहुली चोर येथील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Rayat Bazaar at Mahuli Chor in the 'Vikel to Pickel' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.