आरसीपी जवानांना मारहाण, चौघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 09:36 PM2017-09-28T21:36:04+5:302017-09-28T21:38:10+5:30
हॉटेलनजीक धुमाकूळ घालणाºया तीन तरुणांना हटकणाºया तीन आरसीपी जवानांना मारहाण करण्यात आली. राधानगरस्थित कास्तकार भोजनालायानजीक बुधवारी रात्री ८.३५ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हॉटेलनजीक धुमाकूळ घालणाºया तीन तरुणांना हटकणाºया तीन आरसीपी जवानांना मारहाण करण्यात आली. राधानगरस्थित कास्तकार भोजनालायानजीक बुधवारी रात्री ८.३५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजीक रज्जाक रायलीवाले असे मारहाण झालेल्या आरसीपी जवानाचे नाव आहे.
सीपी दत्तात्रय मंडलिक हे बुधवारी रात्री शिवाजीनगर, पंचवटी भागात कारवाई करीत असताना हाप्रकार घडल्याने तत्काळ दखल घेतली गेली. रॉयट कंट्रोल पोलीस (आरसीपी) म्हणून कार्यरत पोलीस शिपाई राजीक रज्जाक हे बुधवारी रात्री पायदळ गस्त घालत असताना त्यांना किशोर रायकर यांनी राधानगर भागात चार इसम आरडाओरडा करीत असल्याची माहिती दिली. सदर इसम एम.एच. २७-०६-डब्ल्यू ०८२८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राजीक रज्जाक हे कास्तकार भोजनालयाजवळ पोहोचले.
‘रॅश ड्रायव्हिंग’वर सीपींची नजर
अमरावती : त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यातील रामसिंग बघेल व अन्य तिघांनी राजिक यांची कॉलर पकडून मारहाण केली. त्यांच्या मदतीला धावलेले पोलीस काँस्टेबल किशोर व सूरज यांना अश्लिल शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजिक रज्जाक यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी रामसिंग चंदेल (२५,नांदगाव पेठ) व अन्य तीन अज्ञात इसमांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी बुधवारी रात्री शिवाजीनगर, राधानगर, पंचवटी आणि जेलरोडसह विलासनगर भागाची झाडाझडती घेतली. त्यादरम्यान त्यांनी रॅश ड्रायव्हिंगसाठी करण्यात येणाºया दुचाकी जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्याशिवाय हातगाडीचालकांकडे घरगुती सिलिंडर आढळल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले.