विद्यापीठात पुनर्मूल्यांकनाला फाटा, तीन कोटीचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:28+5:302020-12-31T04:14:28+5:30
अमरावती : यंदा ऑनलाईन परीक्षांमुळे पुनर्मूल्यांकन नाही. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला तीन कोटीच्या उत्पन्नापासून मुकावे लागले. ...
अमरावती : यंदा ऑनलाईन परीक्षांमुळे पुनर्मूल्यांकन नाही. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला तीन कोटीच्या उत्पन्नापासून मुकावे लागले. मात्र, विद्यार्थ्यांना अनावश्यक आर्थिक संकटातून मुक्ती मिळाल्याचा आनंददेखील तितकाच आहे.
उन्हाळी व हिवाळी २०२० अशा दोन्ही परीक्षांमध्ये यंदा पुनर्मूल्यांकनाला फाटा मिळाला आहे. प्रत्येक परीक्षेत ८० हजार उत्तरपत्रिकांचा पुनर्मूल्यांकनासाठी वापर होतो. एका परीक्षेतून सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये पुनर्मूल्यांकनाचे विद्यार्थ्यांकडून जमा केले जातात. परंतु, यावर्षी परीक्षांचे पुनर्मूल्यांकन नाही तर उत्पन्न नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बजेटच्या प्रस्तावित उत्पन्न आणि खर्चाची नोंद बघता पुनर्मूल्यांकनाअभावी तीन कोटीचे उत्पन्न घटल्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यापीठात एकमात्र परीक्षा विभागातून उत्पन्न मिळते, हे विशेष. पुनर्मूल्यांकनामुळे तीन कोटीचे उत्पन्न बुडाल्याचे परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी सांगितले.
----------------------
पदव्युत्तर प्रवेशासाठी चिक्कार गर्दी (फोटो आहे)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेशासाठी बुधवारी चिक्कार गर्दी उसळली होती. ३१ डिसेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख असल्याने विभागातून पीजी प्रवेशासाठी गर्दी झाली. कोरोना संसर्गाची भीती असतानासुद्धा चिक्कार गर्दी टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. केंद्रीय प्रवेश समितीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सन २०२१-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश निश्चित केले जात आहेत. गुरुवारी प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे.