आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:46+5:302021-07-11T04:10:46+5:30

अमरावती : आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १९८० ...

Re-extension of RTE admission process | आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

googlenewsNext

अमरावती : आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १९८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आतापर्यंत १०२० जणांचे प्रवेश निश्चित झाले. सुरुवातील या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याकरिता ३० जूनची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तरीही १०० टक्के प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांना प्रवेशास आता २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये नर्सरी आणि पहिल्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी १४ तालुक्यांतील २४४ शाळांमध्ये प्रवेशाकरिता ५,९१८ अर्जांपैकी सोडतीत १,९८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेशाची प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात आली. याला मुदतवाढ देऊनही प्रवेश पूर्ण प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. येत्या २३ जुलैपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पात्र पालकांना पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.

बॉक्स

आरटीई प्रवेशाची स्थिती

नोंदणी केलेल्या शाळा -२४४

राखीव जागा -२०७६

एकूण प्राप्त अर्ज -५९१८

सोडतीत पात्र संख्या -१९८०

तात्पुरते प्रवेश -९२९

निश्चित प्रवेश -१०२०

कोट

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील १,९८० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी १०२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. उर्वरित प्रवेशासाठी आता पुन्हा दुसऱ्यांदा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानुसार पालकांनी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Re-extension of RTE admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.