विमवि नॅक मूल्यांकनासाठी सज्ज

By admin | Published: February 6, 2017 12:11 AM2017-02-06T00:11:41+5:302017-02-06T00:11:41+5:30

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे पूर्वीचे विदर्भ महाविद्यालय हे अमरावतीतच नव्हे, ...

Ready for inspection nayak | विमवि नॅक मूल्यांकनासाठी सज्ज

विमवि नॅक मूल्यांकनासाठी सज्ज

Next

बांधकाम स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना : शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर करणार
अमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे पूर्वीचे विदर्भ महाविद्यालय हे अमरावतीतच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाड - विदर्भातील नामवंत शैक्षणिक संस्था आहे. अमरावती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी १६८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात संस्थेच्या अनेक इमारती आहेत. मुख्य इमारत बांधकाम स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. अमरावती शहरात भेट देणारे पर्यटक, अभ्यासक या परिसराला आवर्जून भेट देत असतात. वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या संस्थेचे नॅकद्वारे मूल्यांकन करण्यासाठी ६, ७, व ८ फेब्रुवारी २०१७ रोजी बंगळूरूच्या मुख्य कार्यालयातील मूल्यांकन समिती येणार आहे. सदर मूल्यांकनासाठी संचालक संगीता यावले यांच्या नेतृत्वात संपूर्ण संस्थेतील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी सज्ज आहेत. नॅकच्या अनुषंगाने सर्व तयारी जवळपास आटोपली आहे.
नॅक मूल्यांकनासाठी येणारी समिती : अध्यक्ष : प्रा. शशी के. धीमन (माजी कुलगुरु - एच.पी. तांत्रिक विद्यापीठ, हिमाचल प्रदेश)
सदस्य : पी.एस. जयरामु (माजी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग बंगलोर विद्यापीठ बंगलोर) (समिती समन्वयक), उदयन चंद्रा सरकार (माजी प्राचार्य, बी.बी. कॉलेज, आसनसोल, पश्चि बंगाल). प्रस्तुत नॅक टीम तीन दिवस संस्थेच्या मूल्यांकनाचे कार्य करणार असून याद्वारे संस्था शैक्षणिक व इतर पूरक प्रगतीचा आढावा सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ready for inspection nayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.