रियल इस्टेट बाजार जोरात; घरविक्रीच्या श्रावणसरी....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:56+5:302021-08-12T04:16:56+5:30

अमरावती: स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आर्थिकदृष्ट्या बघायला गेल्यास 'घर विकत घेणे’ हा कुठल्याही ...

The real estate market booms; Shravanasari of home sale ....! | रियल इस्टेट बाजार जोरात; घरविक्रीच्या श्रावणसरी....!

रियल इस्टेट बाजार जोरात; घरविक्रीच्या श्रावणसरी....!

Next

अमरावती: स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आर्थिकदृष्ट्या बघायला गेल्यास 'घर विकत घेणे’ हा कुठल्याही कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. कोरोनाकाळातील शहरातील तीनही सहदुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीची आकडेवारी पाहिल्यास रियल इस्टेट बाजार जोरात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकांनी नवे घर खरेदी केले. तर शेकडो जणांनी घर असूनही गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदीला पसंती दिली आहे.

आपण घर जर स्वतः राहण्यासाठी घेत असलो तर त्यातून भविष्यात परतावा काय मिळेल वगैरे गोष्टींचा विचार करायची विशेष गरज आता राहिलेली नाही. 'रिअल इस्टेट नेहेमीच चांगला परतावा मिळवून देते' अशा विश्वासापोटी केवळ गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर दीर्घकाळात सर्व खर्च आणि कर वजा जाता महागाईदरापेक्षा जास्त परतावा त्यातून खरंच मिळू शकेल काय या विषयी विचार केलेला हवा. तो विचारही अलिकडे सकारात्मक असाच राहिला आहे. घर, फ्लॅट वा भूखंडांमध्ये केलेली गुंतवणूक अलिकडे फायदेशीरच ठरली आहे. म्हणूनच की काय, यंदाच्या पहिल्या सात महिन्यात तब्बल १० हजार ५०३ दस्तनोंदणी झाली. अर्थात तेवढे खरेदी विक्री व्यवहार झाले.

कोणत्या महिन्यात किती रजिस्ट्री

जानेवारी : १९५०

फेब्रुवारी : ११३२

मार्च : २०३७

एप्रिल : १५०३

मे : ५५१

जून : १७४३

जुलै : १५८७

/////////////////////

दररोज सरासरी ६० रजिस्ट्री

अमरावती शहरातील खरेदी विक्री व्यवहाराच्या दस्त नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सहदुय्यम निबंधक १, २ व ३ असे तीन कार्यालय आहेत. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात येथे तीनही कार्यालयात एकूण १० हजार ५०३ दस्तनोंदणी झाली. सुटीचे दिवस वगळता दररोज सरासरी ६० रजिस्ट्री येथे होतात.

/////////////////////////

गुंतवणूक म्हणून घर घेणारेच अधिक

सोने खरेदीत गुंतवणूक केली तरी ती फारशी फायदेशीर ठरणार नाही, सोने विकतेवेळी बट्टा, डाग म्हणून मोठी रक्कम कापली जाते. त्यामुळे गुंतवणूक म्हणून घर घेणारेच अधिक आहेत. घर केव्हाही विकले, तरी फायदा होतोच, हे अलिकडचे आश्वासक चित्र आहे. त्यात खूप फायदा होणार नाही, मात्र तोटा होत नाही, हे उमगल्याने घरांमध्ये गुंतवणूक करणारे वाढले आहेत.

///////////////

म्हणून वाढल्या घरांच्या किमती

प्लॉट : खुल्या भूखंडाच्या किमती आधीच्या तुलनेत अधिक वाढल्या.

सिमेंट : सिमेंट पोते ३६० ते ३८० च्या घरात आहेत.

स्टील: लोखंडाचे भाव मागील तीन वर्षांत दुपटीवर पोहोचले.

वीट : अन्य बांधकाम साहित्यासह वीट देखील महागली

वाळू: वाळुघाटाचे लिलाव थांबल्याने अवैधरित्या वाळू घ्यावी लागते.

/////////////////////

घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

भूखंड विकत घेऊन त्यावर घर बांधणे आता स्वप्न ठरले आहे. चार वर्षांपुर्वी १८ ते २० लाखात मिळणारा टू बिएचके फ्लॅट २५ ते ३० लाखांपर्यंत पोहोचला.

भंवरलाल जाखड, खरेदीदार

कोट २

शहरातील आऊटस्कर्ड एरियातील भूखंडाचे दर १५०० ते २ हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे अवघा १ हजार प्लॉट घेऊन त्यावर कसेबसे राहण्यापुरते घर बांधावे लागले.

नरेंद्र वानखडे, खरेदीदार

नव्वदच्या दशकातील रिअल इस्टेट -

आपण थोडे मागे जाऊन विचार केला तर असे दिसून येईल की नव्वदीच्या दशकापर्यंत लोक घर घेताना राहण्यासाठी किंवा 'सेकंड होम' म्हणूनच विचार करायचे.

रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणारे हे बहुतांशी काळं धन लपवण्यासाठी करणारे असायचे.

मध्यमवर्गीयांसाठी 'घर' म्हणजे (चांगला परतावा देणारी) गुंतवणूक, हे समीकरण २००० सालानंतर निर्माण झाले.

या काळात गृहकर्जे स्वस्त होऊ लागली, टॅक्सचे नियम बदलल्याने गृहकर्जाच्या परतफेडीत आयकरातून सूट मिळू लागली आणि १९९१ सालच्या आर्थिक उदारीकरणाचे फायदे वाढीव उत्पन्नाच्या स्वरुपात मध्यमवर्गीयांपर्यंत पोचायला लागले होते.

परिणामस्वरूप नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस घरांची मागणी प्रचंड वाढली आणि पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला. सुमारे २००१ ते २००८ या काळात घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या.

त्या काळात रिअल इस्टेटमधे 'कर्ज काढून गुंतवणूक' करणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला.

गृहकर्जांवरील व्याजदरापेक्षा जास्त दराने रिअल इस्टेटच्या किमती वाढत होत्या. नवीन गृहनिर्माण योजनांमध्ये एकदम अनेक फ्लॅट विकत घ्यायचे आणि पुढील २-३ वर्षात खरेदी किमतीच्या ४०%-५०% वर ते विकून टाकायचे, असे असंख्य 'गुंतवणूकदार' त्याकाळात फोफावले.

ह्या कालखंडात रिअल इस्टेट इंडस्ट्रीच्या सततच्या मार्केटींगमुळे जनमानसात रिअल इस्टेटला एक 'गुंतवणूक' म्हणून स्थान मिळालं.

Web Title: The real estate market booms; Shravanasari of home sale ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.