समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य लाभले
By admin | Published: July 9, 2017 12:21 AM2017-07-09T00:21:40+5:302017-07-09T00:21:40+5:30
स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात वेगळाच आनंद आहे.
बच्चू कडू : बालाजी मंदिर सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात वेगळाच आनंद आहे. समाजकार्यातून समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत असते. हे समाजकार्य करण्यात माहेश्वरी समाज नेहमीच अग्रेसर असतो. माहेश्वरी समाज हा सर्वाधिक दानशूर समाज आहे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी
केले.
ते स्थानिक श्री बालाजी मंदिर संस्थानद्वारा आयोजित सत्कार समारोहात सत्काराला उत्तर देत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रवींद्र पवार, प्रमुख अतिथी श्रीवल्लभ भट्टड, ब्रिजमोहन हरकुट, प्रहारचे अतुल खुपसे, सचिन खुळे, मंगेश देशमुख, सुभाष मेश्राम, छोटू महाराज वसू, अभियंता विनोद औतकर, प्रमोद कुदळे, रमेश कारमोरे, मुजफ्फर हुसेन, अंजली पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आ. बच्चू कडू यांनी दिलेल्या ७ लक्ष रुपयांच्या निधीतून बालाजी मंदिरात सभागृह निर्मिती सुरू आहे. या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. सोबतच आ. कडू यांचे स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच आ. बच्चू कडू यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यामध्ये रचिता सारडा, गौरी नांगलिया, हर्ष कोठारी, राधा नांगलिया, सेजल चांडक, निशा मुंदडा, राधा चांडक, खुशबू नांगलिया, केतकी वर्मा, ऋषभ छाजेड, टिलोर मुणोत यांचा समावेश होता. तसेच सुरेखा श्याम भट्टड यांचा समावेश आहे.