पाण्यासाठी मुस्लीम समुदायाचे अल्लाकडे साकडे

By admin | Published: July 9, 2017 12:19 AM2017-07-09T00:19:55+5:302017-07-09T00:19:55+5:30

पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला आहे, मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Recognize the Muslim community for water | पाण्यासाठी मुस्लीम समुदायाचे अल्लाकडे साकडे

पाण्यासाठी मुस्लीम समुदायाचे अल्लाकडे साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला आहे, मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसासाठी जसा हिंदू समाज देवाची प्रार्थना करीत आहे, त्याच प्रमाणे मुस्लिम बांधंवानीदेखील पावसासाठी अल्लाह (ईश्वर) कडे साकडे घातले व शुक्रवारची नमाज अदा केली.
यंदा पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. सोबतच पारंपरिक अंदाजावरून देखील पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे सांगण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली. पावसाने दांडी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी टाळली. दरम्यानच्या काळात पाऊस आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र ही संख्या निम्म्याहून कमी आहे. येवदा परिसरात केवळ ४०-४५ टक्केच पेरणी झाली आहे. यामुळे शेतकरी मेटाकुळीस आला आहे. दुबारा पेरणीची संकट ओढावले असून यामुले शेतकरी व शेत मजुरचे हाल होत आहेत.
दयार्पूर तालुक्यातील येवदा गावातील मुस्लिम बांधव पावसाला विनवणी करण्यासाठी अनवानी पायाने ईदगाहपर्यंत पोहोचले. अल्लाहने मेहरनजर करून धरती ओलीचिंब करावी, यासाठी साकडे घातले. शुक्रवारच्या नमाजीमध्ये अबाल वृद्ध सामील झाले होते.

मारुतीरायाला पाण्याचा अभिषेक
वरुण राजाची कृपा व्हावी, यासाठी परिसरातील गावांमधील मारुतीला पाण्याचा अभिषेक करण्यात येत आहे. अनेक गावांत धोडी काढून आर्जव केला जात आहे. येवदा येथील मारुती मंदिरात पाण्यासाठी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Recognize the Muslim community for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.