बुडीत क्षेत्राचे पोलीस बंदोबस्तात फेरमूल्यांकन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:35 AM2019-05-30T01:35:27+5:302019-05-30T01:35:40+5:30
खोपडावासीयांच्या बुडीत क्षेत्रातील घरांचे फेरमूल्यांकन पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणाच्या तिसºया दिवशी बुधवारी जि.प. सदस्य संजय घुलक्षे यांच्या नेतृत्वात सुमारे ६०० जणांचा समुदाय उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या कार्यालयात धडकला. त्यांना घेराव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : खोपडावासीयांच्या बुडीत क्षेत्रातील घरांचे फेरमूल्यांकन पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणाच्या तिसºया दिवशी बुधवारी जि.प. सदस्य संजय घुलक्षे यांच्या नेतृत्वात सुमारे ६०० जणांचा समुदाय उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या कार्यालयात धडकला. त्यांना घेराव करण्यात आला. तोडगा न निघाल्यास ३० मे पासून रखरखत्या उन्हात अन्नत्याग व त्यानंतर जलत्याग आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सन २०१४ मध्ये चारघड नदीला आलेल्या महापुरात १०० कुटुंबे बाधित झाली होती, तर छकुली शिंदे ही चिमुरडी वाहत गेली. निम्न चारघड प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील घरांची मोजणी अधिकाऱ्यांमार्फत केली असता, तफावत आढळून आल्याने गावकरी विरोध करीत आहेत. या प्रकल्पाचे काम रखडल्यास अनेक घरांची पडझड व मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. २०११ च्या मूल्यांकनानुसार ज्यांना मोबदला हवा, त्यांना तातडीने मोबदला द्यावा. २०१६ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचे बांधकाम पडले, त्यांना जुन्याच पद्धतीने मोबदला द्यावा. कच्चे बांधकाम पाडून पक्के केले असल्यास त्याचे मोजमाप करून मूल्यांकन करावे. २०१६ मध्ये सुटलेल्या १४ घरांचा जीआरएम करून त्यांना मूल्यांकन देण्यात यावे. गावातील धार्मिक स्थळांना प्लॉट उपलब्ध करावे या मागण्यांसोबतच १७ ते १८ गावे सुजलाम् सुफलाम् करणाºया निम्न चारघड प्रकल्पाचे काम विनाविलंब सुरू करण्यात यावे, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली.
दरम्यान, उपोषण करीत असलेल्या सात ते आठ जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांची वैद्यकीय अधिकाºयांमार्फत तपासणी करण्यात आली. बुधवारी वसुधा बोंडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. यावेळी नीलेश चौधरी, हरिदास लुंगे, भारती इंगळे, नितीन लुंगे, मंगेश लांडे, सचिन वानखडे, शीला डरंगे, सविता वानखडे सविता वानखडे, रंजना लुंगे, रंजना चौधरी, रजनी काळे, प्रमिला लुंगे, शोभा लुंगे, माधुरी कुरवाळे, गुंफा कुरवाळे आदी उपस्थित होते.