अमरावतीत ७० तास गायनाचा विक्रम, वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 06:52 PM2017-11-03T18:52:50+5:302017-11-03T18:53:13+5:30
येथील बाबलेश ऊर्फ बाबा गडलिंग व सुलभा खोब्रागडे यांच्या सलग ७० तास गायनाचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये समाविष्ट झाला आहे.
अमरावती : येथील बाबलेश ऊर्फ बाबा गडलिंग व सुलभा खोब्रागडे यांच्या सलग ७० तास गायनाचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये समाविष्ट झाला आहे. गतवर्षी तब्बत तीन दिवस व तीन रात्री त्यांनी गायन अविरत केले. यादरम्यान त्यांनी एक हजाराहून अधिक गाणी म्हटली.
विदर्भात आॅकेस्ट्राच्या माध्यमातून बबलेश गडलिंग यांनी ओळख निर्माण केली आहे. ‘गिनीज बूक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद व्हावी यासाठी त्यांनी २०१६ साली नामांकन केले होते. त्यांना परवानगीदेखील मिळाली. त्यानुसार बबलेश गडलिंग व गायिका सुलभा खोब्रागडे यांनी १५ ते १८ आॅक्टोबर २०१६ रोजी सलग ७० तास गीतगायन केले. त्यांच्या या कामगिरीचा समावेश ‘वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया’मध्ये केल्याचा संदेश त्यांना मिळाला आहे. यामुळे वरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. बबलेश व त्यांच्या सहका-यांचा नागरी सत्कार आयोजित केला जाणार आहे.
कोट
वरूड शहराने दिलेले प्रेम कधीच विसरता येणार नाही. लोकांचा प्रतिसाद लाभल्यानेच आम्हाला ही कामगिरी करता आली. गिनिज बूकमध्ये नोंद व्हावी यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत.
- बबलेश गडलिंग, गायक