शिक्षण विभागात पुन्हा कोरोना संक्रमिताची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:00 AM2021-01-02T05:00:00+5:302021-01-02T05:00:57+5:30

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होऊ घातली आहे. या निवडणुकीनिमित्त मतदान प्रक्रियेसाठी  ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानुसार शिक्षण विभागात आतापर्यंत दोन कर्मचारी व एका महिला कर्मचाऱ्याचा पती असे तिघे कोरोनाग्रस्त आढळून आले होते. अशातच आता शुक्रवारी एका कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Record of corona infection again in the education department | शिक्षण विभागात पुन्हा कोरोना संक्रमिताची नोंद

शिक्षण विभागात पुन्हा कोरोना संक्रमिताची नोंद

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : संख्या पोहोचली चारवर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :   जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गत दोन दिवसांपूर्वी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याशिवाय एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीलासुद्धा कोरोनाची लागण झाली. अशातच शुक्रवारी पुन्हा एक कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळला. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या चार वर पोहोचली आहे. शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. 
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होऊ घातली आहे. या निवडणुकीनिमित्त मतदान प्रक्रियेसाठी  ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानुसार शिक्षण विभागात आतापर्यंत दोन कर्मचारी व एका महिला कर्मचाऱ्याचा पती असे तिघे कोरोनाग्रस्त आढळून आले होते. अशातच आता शुक्रवारी एका कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागासह परिसर सॅनिटाईझ करण्यात आला. याशिवाय अन्य खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड. खान यांनी दिली. 
कामकाज सुरूच
प्राथमिक शिक्षण विभागात कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळून आल्यानंतर शिक्षण विभागात प्रशासकीय कामकाज सुरूच आहे. शिक्षण विभागात एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीसह तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही या विभागात कामकाज सुरू असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कार्यालय काही दिवस बंद ठेवले जात होते. आता मात्र कार्यालय सुरू ठेवले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Record of corona infection again in the education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.