नियमबाह्य वृक्ष कटाई अन् वनाधिकाऱ्यांसाठी वसुली

By admin | Published: November 19, 2015 12:44 AM2015-11-19T00:44:40+5:302015-11-19T00:44:40+5:30

नियमबाह्य आडजात वृक्ष कटाईची परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी येथील ‘सॉ मिल’ असोसिएशनने वनाधिकाऱ्यांच्या नावे लाखो रुपये गोळा केले आहेत.

Recovery for External Tree Harvesting and Forest Rights | नियमबाह्य वृक्ष कटाई अन् वनाधिकाऱ्यांसाठी वसुली

नियमबाह्य वृक्ष कटाई अन् वनाधिकाऱ्यांसाठी वसुली

Next


अमरावती : नियमबाह्य आडजात वृक्ष कटाईची परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी येथील ‘सॉ मिल’ असोसिएशनने वनाधिकाऱ्यांच्या नावे लाखो रुपये गोळा केले आहेत. यात उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी, वनपाल ते वनरक्षक अशी यादी तयार करुन प्रत्येक सॉ मिलकडून १ लाख २० हजार रुपयांचे ‘कलेक्शन’ करण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आडजात वृक्षांची कटाई केली जाते. या दोन महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडील आडजात वृक्ष कटाईला वेग येतो. वनाधिकाऱ्यांकडून आडजात वृक्ष कटाईत अडथळा येऊ नये, यासाठी सॉ मिल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना वाटप करण्यासाठी सुमारे १८ लाख रुपयांचे ‘कलेक्शन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वीच एका ‘सॉ मिल’ धारकाकडून ६० हजार रुपये गोळा करण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील रक्कम ही जानेवारी महिन्यांत वसूल केली जाणार आहे.
‘सॉ मिल’धारक छोटीशी रक्कम वनाधिकाऱ्यांच्या हाती देऊन हिरव्यागार वृक्षांची कत्तल करीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Recovery for External Tree Harvesting and Forest Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.