आयकरदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान निधीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:00 AM2020-12-17T05:00:00+5:302020-12-17T05:00:29+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या  ५ कोटी १३ ...

Recovery of PM Kisan Nidhi from income tax paying farmers | आयकरदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान निधीची वसुली

आयकरदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान निधीची वसुली

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूलने बजावल्या नोटिशी, ५.१३ कोटी वसूलपात्र, ३० हजारांचीच वसुली

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या  ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या निधीचा लाभ घेतला आहे. हा निधी परत घेण्यासाठी महसूल विभागाद्वारे तलाठ्यामार्फत आता या शेतकऱ्यांना निधी परत देण्यासाठी नोटीस बजावली आहे. केवळ धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या १५ हप्त्यांचे ३० हजार रुपये आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास परत मिळाले आहेत.
 अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे ३ लाख ३३ हजार ९११ लाभार्थी आहेत. या योजनेच्या आतापर्यंत दोन हजारांचे प्रत्येकी सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत लाभार्थी हा खरा शेतकरीच आहे, ही खातरजमा ऑनलाईन प्रक्रियेत झाली नसल्याने आयकर भरणाऱ्या ६ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साधारणपणे ५.१३ कोटी रुपये जमा झाल्याची बाब आात उघडकीस आली. महसूल विभागाद्वारा ही  रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक अपात्र शेतकऱ्यांच्याही खात्यात हे हप्ते जमा झाले आहेत. काही पात्र शेतकऱ्यांची मदत अन्य खात्यात जमा झाल्याच्याही तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणांत खातेदारांच्या मृत्यूनंतरही खात्यात निधी जमा झालेला आहे. यासाठी केंद्र शासनाने एसओपी पाठविली. त्यानुसार आता निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्याच्या कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना  जिल्हास्तरावर दिल्या आहेत.
वसुलीची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत आयकर भरत असताना योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावणे व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांकडून १५ हप्तांची ३० हजारांची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. इतर तालुक्यांतही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत ४० टक्क्यांवर रक्कम तालुकास्तरावर वसूल करण्यात आली असली तरी जिल्हा कार्यालयात जमा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

सात-बारावर बोजा चढविणार
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील रकमेच्या वसुलीसाठी महसूल विभागाद्वारे फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस बजावल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी असहकार्य केले, त्यांच्यावर आरआरसीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. न जुमानल्यास सात-बारावर बोजा चढविला जाणार आहे. बोजा कमी करण्याच्या वेळी सर्व रक्कम वसूल केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

Web Title: Recovery of PM Kisan Nidhi from income tax paying farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.