बोगस ‘डीन’कडे पदभरती अर्ज छाननी

By admin | Published: January 30, 2017 01:20 AM2017-01-30T01:20:20+5:302017-01-30T01:20:20+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) एम.एच.लकडे मूळात प्राचार्य नसताना त्यांनी

Recruitment of application for recruitment of bogus 'dean' | बोगस ‘डीन’कडे पदभरती अर्ज छाननी

बोगस ‘डीन’कडे पदभरती अर्ज छाननी

Next

राज्यपालांचे चौकशीचे आदेश : शिक्षण, शारीरिक शिक्षण विभागात चार रिक्त पदांची भरती
गणेश वासनिक ल्ल अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) एम.एच.लकडे मूळात प्राचार्य नसताना त्यांनी ‘जुगाड’ लाऊन हे पद पदरात पाडून घेतले. आता कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये लकडे यांच्या या कारनाम्याची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, शिक्षण आणि शारीरिक शिक्षण पदव्युत्तर विभागामध्ये चार रिक्तपदांच्या भरतीसाठी सुरू असलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत लकडे सहभागी झाले आहेत, हे विशेष.
कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने बोगस ‘डीन’ प्रकरणी लकडे यांच्या अफलातून कारभाराची चौकशी सुरु झाली आहे. बीसीयूडी संचालक राजेश जयपूरकर यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे. लकडे यांनी शिक्षण विद्याशाखेत कोणते ‘दिवे’ लावले, याचा वस्तुनिष्ठ अहवाल जयपूरकर येत्या दोन ते तीन दिवसांत कुलगुरूंना सादर करणार असल्याची माहिती आहे. परंतु विद्यापीठात पदव्युुत्तर शिक्षण आणि शारीरिक शिक्षण विभागात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा चार पदांवर भरती केली जाणार आहे. त्याअनुषंगाने आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जात आहे. मात्र ‘डीन’ लकडे हे शनिवारी विद्यापीठात अर्जाच्या छाननीसाठी हजर होते. तीन सदस्यीय समितीने पदव्युत्तरच्या शिक्षण विभागात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदासाठी आलेल्या अर्जाची छाननी देखील त्यांनी केल्याची विश्वसनिय माहिती आहे. एकीकडे चौकशी सुरू असताना लकडे यांच्याकडे अर्जांच्या छाननीची जबाबदारी कोणत्या आधारावर देण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. सोमवार ३० जानेवारीला पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागात दोन पदांच्या भरतीसाठी अर्जाची छाननी केली जाणार आहे. यावेळी ‘डीन’ लकडे उपस्थित राहणार आहेत. परिणामी कुलगरूंनी लकडेंविरुद्ध आरंभलेली चौकशी खरेच नि:पक्षपणे केली जात आहे काय, याबाबत साशंकता वर्तविली जात आहे. उच्चपदस्थांनी विद्यापीठात नियमांची ऐसीतैशी करून शिक्षणक्षेत्राची प्रतिमा मलिन केली आहे. ‘डीन’पदासाठी आवश्यक अटी, शर्ती पूर्ण न करता लकडे यांनी शिक्षण विद्याशाखेचा कारभार ताब्यात घेतला. पीएचडी गाईड म्हणून त्यांची कामगिरी संशयास्पद आहे. ‘डीन’ लकडे यांच्या मार्गदर्शनात शारीरिक शिक्षणक्षेत्राशी संबंधित पीएचडीसाठी ज्यांनी प्रबंध सादर केलेत, त्यांच्या पीएचडी पदव्यांना आता चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.

राज्यपालांच्या आदेशाने लकडेंची चौकशी सुरु
४शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता लकडे यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी अजय गुल्हाने यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याक डे डिसेंबर २०१५ मध्ये तक्रार दिली होती. यातक्रारीची दखल घेत राज्यपाल कार्यालयातून कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना पत्र प्राप्त झाले आहे. लकडे यांच्या ‘डीन’ प्रकरणी चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे निर्देश कुलगुरुंना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार लकडे यांची चौकशी आरंभली आहे.

चौकशीचा निकाल येईपर्यंत कारभार करता येतो. विद्यापीठ कायद्यात तशी तरतूद आहे. एकदा कारवाई निश्चित झाली तर कोणतीही जबाबदारी देता येत नाही. ‘डीन’ एम.एच.लकडे यांच्याविरुद्ध केवळ चौकशी सुरु आहे.
- अजय देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती.

Web Title: Recruitment of application for recruitment of bogus 'dean'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.