‘पेसा’ची पदभरती लपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:27 PM2018-02-10T22:27:22+5:302018-02-10T22:29:07+5:30

मेळघाटातील आदिवासींचा सर्वात मोठा सण असलेल्या होळीपूर्वी मनरेगाचे वेतन द्यावे, गावागावांत रोजगाराची कामे सुरू करावी, कामासाठी स्थलांतर होता कामा नये, ....

The recruitment of Pesa was hidden | ‘पेसा’ची पदभरती लपविली

‘पेसा’ची पदभरती लपविली

Next
ठळक मुद्देभिलावेकर संतापले : कामचुकारांचे उपटले कान, होळीपूर्वी वेतन द्या

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : मेळघाटातील आदिवासींचा सर्वात मोठा सण असलेल्या होळीपूर्वी मनरेगाचे वेतन द्यावे, गावागावांत रोजगाराची कामे सुरू करावी, कामासाठी स्थलांतर होता कामा नये, पेसा कायद्यांतर्गत नोकर भरतीची माहिती का लपविली, याचे उत्तर मागित मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर यांनी अधिकाºयांना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत अडीच तास धारेवर धरले.
मेळघाटातील पेसाअंतर्गत १८ संवगार्तील पदभरती घ्यावी. अधिकाºयांनी याची माहिती आदिवासींपर्यंत पोहोचवावी. घरकुलची देयके लाभार्थ्यांना वेळेवर द्यावे. लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, असे सक्त निर्देश त्यांनी दिले. डिजिटल व्हिलेज हरिसालमधील कामाचा आढावा घेण्यात आला.
मजुरांचे स्थलांतरण होऊ नये
मग्रारोहयोअंतर्गत कामांची मजुरी लवकर द्यावी. होळी सण हा सण आदिवासींना महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व मजुरांना मजुरी द्यावी. एकही मजूर बाहेर स्थलांतर होता कामा नये. त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावे. धारणी व चिखलदरा तालुक्यात अकुशल कामे अधिक होतात. सर्व विभागांनी कुशलमध्ये सुद्धा कामे घ्यावी, असे सक्त निर्देश आ. प्रभुदास भिलावेकर यांनी दिले.
शेतकऱ्यांना सहानुभूती द्या
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर कामांना वनविभागाने परवानगी द्यावी. बांबू व तेंदूपत्ता यांची कामे ग्रामसभेच्या प्रस्तावानुसार स्थानिकांना द्यावे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करावी. लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती द्यावी व सहानुभूती पूर्वक वागणूक द्यावी, असे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: The recruitment of Pesa was hidden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.