प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर रेड्डींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:00 AM2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:57+5:30

दीपाली चव्हाण यांंनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्रीनिवास रेड्डी हेदेखील तितकेच दोषी असल्याचे नमूद केले होते.  

Reddy arrested on orders of Pragya Sarvade | प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर रेड्डींना अटक

प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर रेड्डींना अटक

Next
ठळक मुद्देमुंबईला जाण्यापूर्वी एसपी कार्यालयातून मोहर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक  व तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डींना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. आयपीएस चौकशी पथकप्रमुख अपर पाेलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या आदेशाने ही कारवाई झाली. 
दीपाली चव्हाण यांंनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्रीनिवास रेड्डी हेदेखील तितकेच दोषी असल्याचे नमूद केले होते.  
दरम्यान राज्य शासनाने दीपाली मृत्यूप्रकरणी श्रीनिवास रेड्डी याच्या भूमिकेच्या चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली. आयपीएस चौकशी पथकाने हरिसाल, अमरावती येथे २१ ते २८ पर्यंत दौरा केला. दीपाली प्रकरणाशी निगडित व्यक्ती, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी आयपीएस प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. २७ एप्रिल रोजी सरवदे व त्यांच्या पथकाने हरिसाल गाठले. दीपाली प्रकरणाची संबंधित घटनास्थळाची पाहणी केली. येथे काही ठिकाणी निरीक्षण केले. वन कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आपबितीची माहिती घेतली. येथील राज्य राखीव दलाच्या विश्रामगृहात पथकातील सहकारी सदस्यांनी नोंदविलेल्या बयाणांवर बुधवारी मंथन केले. काही जणांसोबत त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, २८ एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता येथील एसपी कार्यालय गाठले. वस्तुस्थितीच्या आधारे आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी श्रीनिवास रेड्डीच्या अटकेचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेेचे पथक ॲक्टिव्ह झाले आणि रेड्डी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले. डॉ. प्रज्ञा सरवदे यानंतर मुंबईकडे जाण्यासाठी नागपूर मार्गे वाहनाने रवाना झाल्या. त्या गेल्यानंतरही सकाळी १० ते १ असे तीन तास आयपीएस चौकशी पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणी केली, हे विशेष. 
दरम्यान, धारणी  येथील कनिष्ठ न्यायालयाने गुरुवारी श्रीनिवास रेड्डींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

धारणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली. फौजदारी कारवाईसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. आरोपपत्र न्यायालयात दाखल करताना मात्र शासनाला कळवावे लागतात. रेड्डींवर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
- हरी बालाजी एन. पोलीस अधीक्षक, अमरावती

 

Web Title: Reddy arrested on orders of Pragya Sarvade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.