रेड्डी, विनोद शिवकुमारच्या अत्याचारांचे किस्सेे समितीपुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:00 AM2021-04-14T05:00:00+5:302021-04-14T05:00:56+5:30

हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. दीपाली चव्हाण यांना झालेला मनस्ताप अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र, व्याघ्र प्रकल्पातील अनेक वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनाही निलंबित अप्पर प्रधान संरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व  निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी प्रचंड मनस्ताप देऊन नुकसान केल्याचे पुढे येत आहे.

Reddy, Vinod Shivkumar's atrocities before the committee | रेड्डी, विनोद शिवकुमारच्या अत्याचारांचे किस्सेे समितीपुढे

रेड्डी, विनोद शिवकुमारच्या अत्याचारांचे किस्सेे समितीपुढे

Next
ठळक मुद्देमेळघाटात पुरुष कर्मचाऱ्यांचाही जोडगोळीकडून मानसिक छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : दीपाली चव्हाणप्रमाणेच मेळघाटातील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला आजारी पत्नीला औषधोपचारासाठी सुटी नाकारल्याने दोन वेळा गर्भपाताचे  दु:ख झेलावे लागल्याचा धक्कादायक प्रकार तपासणी समितीपुढे आला. व्याघ्र प्रकल्पातील श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार या जोडीच्या अत्याचाराचे   किस्से कर्मचाऱ्यांनी लेखी बयाणात नोंदविले. 
 हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. दीपाली चव्हाण यांना झालेला मनस्ताप अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र, व्याघ्र प्रकल्पातील अनेक वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनाही निलंबित अप्पर प्रधान संरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व  निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी प्रचंड मनस्ताप देऊन नुकसान केल्याचे पुढे येत आहे.

रेड्डीकडे तक्रारी; सर अब मै सुधर गया!
गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा वरिष्ठ ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक प्रकारे मानसिक आर्थिक त्रास, अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी श्रीनिवास रेड्डी याच्याकडे मेळघाट दौऱ्यादरम्यान अनेकदा सांगितल्याचे बयाणात नोंदविल्याची माहिती आहे. विनोद शिवकुमार हा रेड्डीला “सर, अब मै  सुधर गया” असे बोलून मुक्त व्हायचा. विनोद शिवकुमार या शब्दाने तो किती अत्याचार करीत होता. हे त्यानेच तक्रारकर्त्या कर्मचाऱ्यांपुढे कबूल केले, हे विशेष. तरी रेड्डी हा शिवकुमारवर प्रचंड विश्वास दाखवित होता व त्याची प्रत्येक गोष्ट खरी मानत होता.

सुटी न दिल्याने दोन वेळा झाला गर्भपात

मेळघाटात कार्यरत एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची गरोदर पत्नी अन्य जिल्ह्यात शासकीय सेवेत होती. या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पत्नी आजारी असल्याने सुटीवर जायचे होते. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला सुटी मागितली, तर अपमानास्पद वागणूक देऊन पूर्वी सांगितलेल्या कामाचे पत्र बजावले. श्रीनिवास रेड्डीला सांगितले, तर वेतन थांबविण्याचे पत्र दिले. एकीकडे आजारी गर्भवती पत्नीला उपचारार्थ नेण्याची धावपळ, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीचा प्रचंड मनस्ताप त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला  सहन करावा लागला. सुटी न मिळाल्याने गर्भवती पत्नीला मेळघाटात बोलाविले. यात तीन ते चार बसगाड्या बदलवल्याने गर्भपात झाला. परत दुसऱ्यांदा रक्तदाब वाढलेल्या पत्नीच्या उपचारासाठी सुटी न मिळाल्याने गर्भपाताचे दु:ख झेलावे लागले. हे भयानक वास्तव समितीपुढे नोंदविले गेले. 

घाबरू नका, प्रेस, पोलीस पाठीशी
तपासणी समितीत अमराठी अधिकाऱ्यांचा भरणा अधिक असल्याच्या कारणावरून या समितीवर संशय व्यक्त होत होता. मात्र, मेळघाट दौऱ्यादरम्यान एका अधिकाऱ्याने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्भीड होऊन बयाण नोंदवायला सांगितले. प्रेस, पोलीस, न्यायालय तुमच्यासोबत असल्याने तुमचे कोणीच काही करू शकत नाही, अशी हिंमतही कर्मचाऱ्यांना दिली. 

 

Web Title: Reddy, Vinod Shivkumar's atrocities before the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.