घरगुती गॅसच्या किमती कमी करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:58+5:302021-09-04T04:16:58+5:30
वरूड : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून अनुदान कमी केले. सात महिन्यात २८ टक्के ...
वरूड : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून अनुदान कमी केले. सात महिन्यात २८ टक्के वाढ सिंलेडरच्या दरात झाली. घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे गृहिणीचे अर्थचक्र कोलमडले असून, पुन्हा जुने ते सोने म्हणून चुलीवर स्वयंपाक सुरू झाला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारा तहसीलदारांना शुक्रवारी देण्यात आला.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ते गृहिणीचे बजेट कोलमडले. नागरिकांना ९४० रुपयांत सिलिंडर घ्यावे लागत आहे. सात महिन्यात २८ टक्के वाढ सिंलिंडरच्या भावात झाली. यामुळे महिलांमधे चिंतेचे सावट आहे. गोरगरिबांना गॅसऐवजी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार नंदकुमार घोडेस्वार आणि नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांना सादर निवेदनात दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेन शहा, माजी शहराध्यक्ष विलास ऊघडे, महिला तालुकाध्यक्ष अँड प्रणिता चव्हाण, महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे, स्वप्निल आजनकर, तारेश देशमुख, समीर अली, संकेत यावलकर, जगबिरसिंग भावे, राजू सिरस्कर, राजेश्वर कुंभारे, संजय टिकस, दशरथ मालपे, नितीन सदापुरे, हरीश सदापुरे, शैलजा गाेरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.