ऑक्सिजन पार्कच्या शुल्कात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:52+5:302021-08-18T04:18:52+5:30
अमरावती : वनविभागद्धारा संचालित जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्कमध्ये वाढीव शु्ल्कात कपात करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या ...
अमरावती : वनविभागद्धारा संचालित जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्कमध्ये वाढीव शु्ल्कात कपात करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या मागणीनुसार ही शुल्क कपात झाल्याने नागरिकांना आता ऑक्सिजन पार्कमध्ये ये-जा करणे सोयीचे होणार आहे.
अगोदर ऑक्सिजन पार्कमध्ये प्रौढ व्यक्तीला ३० रुपये, तर लहान मुलांसाठी २० रुपये आकारण्यात येत होते. या शुल्कवाढीने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. परिणामी सुनील देशमुख यांनी ऑक्सिजन पार्कच्या शुल्कात कपात करण्यात यावी, याबाबत वनविभागाला पत्र लिहिले होते. याची दखल घेत आता ऑक्सिजन पार्कमध्ये प्रवेशासाठी वनविभागाद्वारे प्रवेश फी प्रौढांकरिता १५ रुपये व लहान मुलांकरिता ५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. सुनील देशमुख यांच्या मागणीला यश आले आहे. नागरिकांना दिलासा मिळाला असून, वनविभागाला पार्कचे व्यवस्थापन व निगा राखणे शक्य होणार आहे. सध्या ऑक्सिजन पार्क फक्त सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरू असून राज्य शासनाद्वारे निर्गमित अनलॉकच्या नव्या नियमावलीला अनुसरून काही दिवसात ऑक्सिजन पार्क पूर्ण वेळ नागरिकांच्या उपयोगाकरिता खुले होणार असल्याची माहिती वनविभागाद्वारा मिळाली.