महाविद्यालयीन प्रवेश, परीक्षा शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:58+5:302021-06-10T04:09:58+5:30
अमरावती : कोरोना काळात महाविद्यालये बंद असताना शैक्षणिक वर्ष २०२०- २०२१ मध्ये परीक्षा शुल्क घेण्यात आले. वाचनालय, प्रयोगशाळा, ...
अमरावती : कोरोना काळात महाविद्यालये बंद असताना शैक्षणिक वर्ष २०२०- २०२१ मध्ये परीक्षा शुल्क घेण्यात आले. वाचनालय, प्रयोगशाळा, व्यायामशाळा आदी सुविधांचा वापर बंद आहे. तरीदेखील हे सर्व शुल्क विद्यापीठाकडून वसूल करण्यात आले. त्यामुळे आकारण्यात आलेले अन्यायकारक शुल्क विद्यार्थ्यांना विनाशुल्क परत मिळावे, अशी मागणी मनसे, सिनेट सदस्य मनीष गवई, सोपान कन्हेरकर आदींनी केली आहे.
कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून विद्यार्थ्यांवर कोरोना काळात अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली. विद्यापीठ अथवा महाविद्यालयात विद्यार्थी लायब्ररीमध्ये येऊ शकत नसताना सुद्धा लायब्ररी फी, मेंटेनन्स फी, गणवेश फी असे अनेक प्रकारचे शुल्क विद्यार्थी आणि पालकांकडून जबरदस्तीने घेण्यात आले आहे. जे विद्यार्थी कोविंड मुळे थेट प्रभावित झाले आहे. त्यांची फी महाविद्यालयांनी माफ करावी, अथवा विद्यापीठाने हस्तक्षेप करून त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची फी भरावी, अशा विविध विषयातील शुल्क तसेच परीक्षा शुल्कामध्ये कपात करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता. त्यावेळी जिल्हाध्यक्ष धिरज तायडे, शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, पवन निचित पाटील, शुभम साबळे, ऋषिकेश मुंडेकर, मयूर राऊत, मुकुंद दार्वेकर आदी उपस्थित होते.