दारू पिण्यास पैसे देण्यास नकार, मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:38+5:302021-01-01T04:08:38+5:30

---------------------------------------------- काठीने डोक्यावर मारून जखमी अमरावती : क्षुल्लक कारणावरून युवकाला डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना वलगाव येथील सतीनगरात मंगळवारी ...

Refusal to pay for alcohol, beatings | दारू पिण्यास पैसे देण्यास नकार, मारहाण

दारू पिण्यास पैसे देण्यास नकार, मारहाण

Next

----------------------------------------------

काठीने डोक्यावर मारून जखमी

अमरावती : क्षुल्लक कारणावरून युवकाला डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना वलगाव येथील सतीनगरात मंगळवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी शेख जावेद शेख वहीद (२८, रा. सतीनगर वलगाव) यांच्या तक्रारीवरून शेख आबीद शेख वहीद (२५, रा. सतीनगर वलगाव) बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

----------------------------------------------

संशयित आरोपी ताब्यात

अमरावती : रात्री दरम्यान अस्तित्व लपवून फिरत असलेल्या एका संशयिताला साईनगर परिसरातून राजापेठ पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. दीपक नामदेवराव गायकवाड (३२, रा.दसरानगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

-------------------------------------------------------

रेवसा येथे अवैध दारू जप्त

अमरावती : वलगाव पोलिसांनी रेवसा येथे बुधवारी कारवाई करून ४८० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र रायभान झटाले (५५, रा. रेवसा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------------------------

इसमाचा मृत्यू

अमरावती : मद्य प्राशन करून फुटपाथवर उघडे झोपल्याने थंडीने कडकडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी धामसमोरील जुन्याबायपास रोडवर बुधवारी घडली. त्यांना इर्विन रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सागर भाऊराव राऊत (४५, रा. पिंपरी यादगिरे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी मृताच्या भावाने ही माहिती पोलिसांना दिली. सदर इसम गल्ली मोहल्लात प्लॅस्टिक पन्या व भंगार वेचून उदरनिर्वाह चालवायचा.

Web Title: Refusal to pay for alcohol, beatings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.