शासकीय जमिनीची नोंद केलेल्यांची सातबारावर नावे नोंदवा
By admin | Published: November 24, 2015 12:26 AM2015-11-24T00:26:15+5:302015-11-24T00:26:15+5:30
मेळघाटातील आदिवासी बहूल भागातील बऱ्याच गावांतील आदिवासी बांधवांना दिलेल्या शासकीय वनजमिनी संबंधित लाभार्थ्यांच्या नावाने सातबारावर नोंदविण्यात यावे,
आंदोलन : मानवी हक्क सुरक्षा दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमरावती : मेळघाटातील आदिवासी बहूल भागातील बऱ्याच गावांतील आदिवासी बांधवांना दिलेल्या शासकीय वनजमिनी संबंधित लाभार्थ्यांच्या नावाने सातबारावर नोंदविण्यात यावे, यासाठी सोमवारी माानवी हक्क सुरक्षा दलाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यातील डाबका, सावलीखेडा, टेंबुसोडा, कोरडाढाणा, खिडकी कलम चेंडो, बारातांडा , भुलोरी आ बऱ्याच गावातील आदिवासी बांधवाना जिल्हास्तरीय त्रिसदस्यी समितीने वाटप केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे सात बारावर वनजमिन धारकांचे नाव नोंद करावा यासाठी सातबारा लिखो आंदोलन करूण याबाबत मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे, रघुनाथ चौरपगार, भारती नायदुरे, रमाबाई कांबळे, आर. बी भिलावेकर, सविता भिलावेकर, सौरभ साबळे, रेखा रणबावणे व आदिवासी बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.
(प्रतिनिधी)